राजकारण्यानं कधी आत्महत्या केल्याचं ऐकलं का? : पडळकरांनी केलं MPSC उमेदवारांचं प्रबोधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : निवडणुकीत पडला म्हणून माजी आमदारानं आत्महत्या केली, असं तुम्ही कधी ऐकलं का? मंत्रीपदाच्या यादीत नाव नाही म्हणून एखाद्या आमदारानं आत्महत्या केली असं कधी ऐकलं का? असे सवाल करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एमपीएससी उमेदवारांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. ते आज पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

ADVERTISEMENT

मागील काही काळात एमपीएससी उमेदवारांना येणार अपयश, त्यातून वाढणारं नैराश्य आणि वाढलेल्या आत्महत्येच्या घटना यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिस्थिती कशी हाताळावी यावर पडळकर यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हा तुम्हाला कुठली अडचणी येणार नाही. एमपीएससी नाही झाला, तर गावाकडे सरपंचाची पोस्ट तुमची वाट बघत आहे. तुम्ही नाही झाला तर एमपीएससी पंचायत समिती वाट बघत आहे. तुम्हाला तिथे सभापती होता येईल. एमपीएससी नाही झाला तुम्ही चिंता करू नका. झेडपी मेंबर होता. येईल एमपीएससी नाही झाला आमदार खासदार तर तुम्हाला होता येईल.

हे वाचलं का?

पण इथे स्पर्धा खूप आहे. जो तो म्हणतो एमपीएससीत स्पर्धा मोठी आहे. पण तसं नाही. विधान परिषदेमध्ये ७८ आमदार आहेत. मी झालो तेव्हा १० जण आमदार झाले होते. १२ कोटीतून १० जणांना निवडलं गेलं होतं. २८८ आमदार विधानसभेत आहेत. इथे १२ कोटींतून २८८ जण. ही किती मोठी स्पर्धा आहे, असं पडळकर यावेळी म्हणाले.

तसंच, निवडणुकीत पडला म्हणून कोणी माजी आमदाराने आत्महत्या केली असं कधी तुम्ही ऐकलं का? मंत्रीपदाच्या यादीत नाव आलं नाही म्हणून या आमदारानं आत्महत्या केली असं ऐकलं का? त्यांना काय निराशा आली नसेल का? पण तरीही ते आठव्या दिवशी लोकांमध्ये दिसतात, असंही पडळकर म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT