Rohit Pawar | बारामती ॲग्रो कारखान्याची चौकशी करुन गुन्हा दाखल करा; राम शिंदेंची मागणी
पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याची चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार राम शिंदे यांनी केली. सोमवारी दुपारी त्यांनी याबाबतचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले. 15 ऑक्टोबर रोजी ऊस गाळप हंगाम सुरु करण्याचे आदेश असताना त्यापूर्वीच बारामती ॲग्रो कारखाना सुरु केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. आमदार राम शिंदे यांनी […]
ADVERTISEMENT
पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याची चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार राम शिंदे यांनी केली. सोमवारी दुपारी त्यांनी याबाबतचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले. 15 ऑक्टोबर रोजी ऊस गाळप हंगाम सुरु करण्याचे आदेश असताना त्यापूर्वीच बारामती ॲग्रो कारखाना सुरु केल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
ADVERTISEMENT
आमदार राम शिंदे यांनी फेसबुकवर याबाबत सविस्तर माहिती दिली. यात त्यांनी म्हटले की, यावर्षीचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू करण्याचे शासनाचे आदेश डावलून नियमाचे उल्लंघन केले आणि आज दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी बारामती ॲग्रो लि. शेटफळगडे ता. इंदापूर जि. पुणे हा कारखाना सुरू करण्यात आला. त्यामुळे कारखान्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेब यांच्याकडे केली.
आमदार शिंदे पुढे म्हणाले, ऊस गाळप हंगाम सुरु करण्याबाबत काही निर्देश देण्यात आले होते. माननीय मुख्यमंत्री समितीने त्याबाबत 19 तारखेला बैठक घेतली, 22 तारखेला साखर आयुक्तांनी प्रसिद्धपत्रकही काढले. परंतु आज रोजी बारामती ॲग्रो कारखाना लि. शेटफळगडे ता. इंदापूर जि. पुणे यांनी त्या कायद्याचा भंग केला. 1984 च्या खंड 6 चे हे उल्लंघन आहे.
हे वाचलं का?
त्यानुसार आज मी साखर आयुक्तांची भेट घेऊन समितीने दिलेल्या निर्देशांचे आणि नियमांचे उल्लंघन केले असल्याचे सांगितले. साखर आयुक्तांनी याबाबत आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून आजच्या आज चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतो, असे सांगितले आहे, अशी माहितीही आमदार शिंदे यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT