BJP : ‘तो’ पर्यंत सत्यजीत तांंबेंना भाजपमध्ये घेणार नाही! बावनकुळे काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपकडून कोणतीही ऑफर नाही. तसंच त्यांना भाजपमध्ये या असे म्हटलेले नाही आणि म्हणणारही नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे स्पष्ट केले. जोपर्यत सत्यजीत तांबे स्वतःहुन भाजपमध्ये येण्याचे म्हणत नाहीत, तोपर्यत यावर तुर्तास भाष्य नको असेही बावनकुळे यांनी सांगितले. ते ठाण्यात बोलत होते. (bjp State Chairman Chandrashekhar Bawankule Talk on satyajeet Tambe bjp state president)

ADVERTISEMENT

ठाण्यातील पाचपाखाडी येथे भाजपचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक संदीप लेले यांनी आयोजित केलेल्या माघी गणेशोत्सवाला बावनकुळे उपस्थित होते. त्यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, प्रदेश महिला उपाध्यक्षा माधवी नाईक, उपाध्यक्ष राजेश मढवी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आदी उपस्थित होते.

Amboli : मृतदेह फेकताना स्वतःच दरीत पडला… आंबोलीच्या घाटात काय घडलं?

हे वाचलं का?

यावेळी बोलताना आमदार बावनकुळे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळावे यासाठी निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्यात येत असल्याचे आरोप खोडून काढले. या दोन्ही व्यवस्था स्वतंत्र असून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही. दोन्ही यंत्रणा पुरावे पाहून निर्णय घेतील. विरोधक मात्र दबाव आणत असल्याचा कांगावा करीत आहेत, कारण त्यांचे फुटणारे आमदार थांबविण्यासाठीची ही धडपड असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.

MPSC : परीक्षार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; CM शिंदेंची आयोगाला विनंती

ADVERTISEMENT

राज्यात सरकार अस्थिर असल्याच्या वावड्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात बहुमताचे सरकार आहे. जरी विरोधकांनी बहुमत सिद्ध करा, अशी मागणी केली, तरी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस समर्थ आहेत. तेव्हा असलेले १६४ आमदारांचे संख्याबळ आता बहुमत चाचणी केल्यास १८४ होईल, असा मोठा दावाही यावेळी बावनकुळे यांनी केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT