देवेंद्र फडणवीसांचे दावे; आदित्य ठाकरेंचं जशास तसं उत्तर!
मुंबई : एअरबस टाटाचा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या आरोप-प्रत्यारोपांवरुन सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. अशातच सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर दिली. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटा आणि इतर प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाहेर गेल्याचा आरोप त्यांनी काही कागदपत्र दाखवत केला. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी त्वरित पत्रकार परिषद […]
ADVERTISEMENT

मुंबई : एअरबस टाटाचा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या आरोप-प्रत्यारोपांवरुन सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. अशातच सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर दिली. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटा आणि इतर प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाहेर गेल्याचा आरोप त्यांनी काही कागदपत्र दाखवत केला. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी त्वरित पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीसांचे दावे; आदित्य ठाकरेंचं उत्तर!
-
सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प
भाजपचा दावा
: सोशल मिडीयावरुन रायगमधील २० हजार कोटींची गुंतवणूक असलेला सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प युती सरकारच्या काळात आल्याचा दावा करण्यात आला.
मागील ४ महिन्यात महाराष्ट्रात आलेले प्रकल्प!
१. सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प : रायगड : गुंतवणूक : २० हजार कोटी रूपये
२. सोलार इंड्रस्ट्रिज इंडिया प्रकल्प : नागपूर : गुंतवणूक : ३७८ कोटी रूपये
३. महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड प्रकल्प – रायगड : गुंतवणूक : ३७५ कोटी रूप
(1/3) pic.twitter.com/mFLESMicdr
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 31, 2022
आदित्य ठाकरेंचं उत्तर :
देवेंद्र फडणवीस आणि खोके सरकार सांगत आहेत की हा प्रकल्प त्यांनी आणला. पण MIDC च २३ मे २०२२ रोजीच ट्विट सांगत आहे की, दावोसमध्ये या प्रकल्पाचा करार झाला. हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात झालेला आहे.