बारामतीचं घड्याळ बंद पाडणार! भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीचं घड्याळ बंद पाडणार असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर आहेत. त्या अनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत चंद्रशेखर बावनकुळे?

महाराष्ट्रातल्या सर्वच ४८ मतदार संघात आमचा प्रवास आहे. बारामतीत केंद्रीय मंत्री निर्मल सीतारामन ज्या प्रवास करत आहेत. मिशन बारामतीच नाही तर लोकसभेच्या दृष्टीने आमचं मिशन महाराष्ट्र आहे. आमचे विविध मतदारसंघात १६ मंत्री प्रवास करत आहेत. आम्ही आमची संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. निवडणुकीत जनता ठरवेल कोणाला मतदान करायचं आमचा प्रयत्न आहे बारामतीची घड्याळ बंद पाडण्याचा आम्ही आमचे प्रयत्न करू मात्र जनता जो निर्णय देईल तो मान्य करू असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

मिशन बारामती नेमकं काय आहे?

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मिशन बारामती आखलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकून शरद पवार पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. गेली अनेक वर्ष बारामतीवर पवार घराण्याचं निर्विवाद वर्चस्व आहे. सुप्रिया सुळे दोन वेळा लोकसभेवरती निवडून गेल्या आहेत. अजित पवार बारामतीमधून आमदार आहेत. त्यामुळे याच बारामतीमध्ये राष्ट्रवादीला आव्हान देण्याचं भाजपनं ठरवलं आहे. हेच भाजपचं मिशन बारामती आहे. त्याची सुरूवात निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याने झाली आहे.

हे वाचलं का?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हा फुसका बार

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सुरू झालेल्या यात्रेत विविध राज्यांना भेट दिली जाणार आहे. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांची ही यात्रा म्हणजे फुसका बार आहे अशी टीका केली आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रातून तीन चाकांची रिक्षा गेली असून बुलेट ट्रेनच्या वेगात राज्याचा विकास होणार असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलं शनिचं दर्शन

चंद्रशेखर बावनकुळे औरंगाबादहून पुण्याला जाताना शनिशिंगणापूर या ठिकाणी आले होते. तिथे त्यांनी शनि महाराजांचं दर्शन घेतलं. मीडियाशी बोलताना बावनकुळे म्हणाले की अहमदनगरमध्ये आलो की मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा शनिशिंगणापूरला शनि भगवानाचं दर्शन घेतो. आपलं राज्य सुखी, समृद्धी आणि समाधानी राहुदेत अशी प्रार्थना करतो. तसंच महाराष्ट्र क्रमांक १ वर जावा आणि कुठल्याही रोगाचं सावट आता महाराष्ट्रावर येऊ नये अशीच प्रार्थना करतो असंही बावनकुळे यांनी म्हटलंय.

ADVERTISEMENT

भाजपच्या अंतर्गत कार्यकारणीत जानेवारीपर्यंत कोणतीही फेरबदल नाहीये तर शासकीय कमिट्यांवर सदस्य नेमणे बाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपसात बसून निर्णय घेतील. त्यामुळे दोघांच्याही कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. आपलं सरकार अस्थिर असून पूर्ण खंबीर आहे सरकार बहुमतात आहे. तसंच राज्यातला तीन चाकांचा ऑटो गेला आहे. राज्याचा विकास आता बुलेट ट्रेनच्या वेगाने होणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT