मुन्ना यादव यांचं नवाब मलिकांच्या प्रत्येक आरोपांना उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

मी गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता आहे. आज नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप केले कारण त्यांना माहित आहे की मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे ते घाबरून हे आरोप केले आहेत असं मुन्ना यादव यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी माझ्यावर केलेले सगळे आरोप खोटे आहेत. नवाब मलिकांना माहित आहे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मी गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता आहे. आज नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप केले कारण त्यांना माहित आहे की मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे ते घाबरून हे आरोप केले आहेत असं मुन्ना यादव यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी माझ्यावर केलेले सगळे आरोप खोटे आहेत. नवाब मलिकांना माहित आहे की संजय राठोड यांनी काय केलं. अनिल देशमुख का तुरुंगात आहे याचंही कारण त्यांना माहित आहे त्यामुळेच ते आता असे आरोप करत आहेत. माझ्यावर कोणतेही गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत. माझे अंडरवर्ल्ड सोबत संबंध नाहीत. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध सिद्ध होणार आहेत त्यामुळे त्यांचं धाबं दणाणलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आज जो बॉम्ब मलिक यांनी टाकला त्यात कोणताही दम नाही असंही मुन्ना यादव यांनी म्हटलं आहे.

मुन्ना यादव यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना राज्याच्या कामगार मंडळाचं अध्यक्ष का केलं? मी मलिक यांना सांगू इच्छितो, मी आता नवाब मलिकांच्या विरोधात मानहानीचा दावा करणार आहे. नवाब मलिक यांची चौकशी सुरू होणार, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होणार आहेत. माझी आत्तापर्यंत अनेकदा चौकशी झाली आहे. मी आताही कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडून देईन पण सिद्ध झाले नाहीत तर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा असं आव्हानच मुन्ना यादव यांनी नवाब मलिकांना दिलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp