Mumbai Unlock: मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांहून कमी तरीही मुंबईकरांवर Level-3 चे निर्बंध
मुंबई: कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी होत असताना Break The Chain चे नवे नियम शासनाने जाहीर केले असून आता 14 जूनपासून नवे नियम लागू होणार आहेत. ज्यानुसार महाराष्ट्रातल्या (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक होणार आहे. मात्र असं असलं तरीही मुंबई महापालिकेने (BMC) मात्र सर्व काही हळूहळूच सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण अद्यापही मुंबईत (Mumbai) अॅक्टिव्ह रुग्णांचा […]
ADVERTISEMENT

मुंबई: कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी होत असताना Break The Chain चे नवे नियम शासनाने जाहीर केले असून आता 14 जूनपासून नवे नियम लागू होणार आहेत. ज्यानुसार महाराष्ट्रातल्या (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक होणार आहे. मात्र असं असलं तरीही मुंबई महापालिकेने (BMC) मात्र सर्व काही हळूहळूच सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कारण अद्यापही मुंबईत (Mumbai) अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा इतर जिल्ह्यांच्या मानाने जास्तच आहे. त्यामुळे मागील आठवड्यात जे नियम होते तेच नियम मुंबईसाठी पुढील काही दिवस तरी कायम असणार आहेत.
14 जून पासून महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमध्ये होणार Unlock
सध्या मुंबई महानगरपालिका हद्दीत कोव्हिड-19 पॉझिटिव्हिटी रेट हा 4.40 टक्के इतका आहे. तर ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर हा 27.12 टक्के एवढा आहे. यानुसार सध्या मुंबई दुसऱ्या लेव्हलमध्ये आहे. मात्र, काही गोष्टी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने लेव्हल-3 चे नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.









