Navneet Rana: नवनीत राणा, रवी राणांची कटकट वाढली?, BMC ने दारावर लावली नोटीस
हनुमान चालीसा पठणावरून शिवसेना विरुद्ध नवनीत राणा, रवी राणा अशी राजकीय संघर्षांची ठिणगी उडालेली असतानाच आता राणा दाम्पत्यांच्या कटकट वाढली आहे. राणा दाम्पत्याला बृहन्मुंबई महापालिकेनं अवैध बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी खासदार नवनीत राणा यांच्या मुंबईतील खार येथील घराच्या दारावर नोटीस लावली आहे. राणा दाम्पत्याने घरात अवैध बांधकाम केले असल्याचा उल्लेख […]
ADVERTISEMENT

हनुमान चालीसा पठणावरून शिवसेना विरुद्ध नवनीत राणा, रवी राणा अशी राजकीय संघर्षांची ठिणगी उडालेली असतानाच आता राणा दाम्पत्यांच्या कटकट वाढली आहे. राणा दाम्पत्याला बृहन्मुंबई महापालिकेनं अवैध बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली आहे.
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी खासदार नवनीत राणा यांच्या मुंबईतील खार येथील घराच्या दारावर नोटीस लावली आहे. राणा दाम्पत्याने घरात अवैध बांधकाम केले असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे.
मुंबई महापालिकेनं दिलेल्या नोटीसमधील माहितीप्रमाणे महापालिकेचे अधिकारी ४ एप्रिल रोजी राणांच्या घरी जाणार आहेत. अधिकारी घराची पाहणी करून फोटोही घेणार आहेत.
मुंबई महापालिका कायदा १८८८ मधील कलम ४८८ नुसार राणा दाम्पत्याला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. राणा दाम्पत्यांच्या घरात अवैध बांधकाम करण्यात आल्याचं म्हटलेलं असून, याची चौकशी करण्यासाठी अधिकारी घरी जाऊन पाहणी करणार आहेत.
नवनीत आणि रवी राणांवर मुंबई पोलिसांनी ‘याच’ कारणामुळे दाखल केला राजद्रोहाचा गुन्हा
महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जवळच्या व्यक्तींनी ही कारवाई राजकीय आकसातून केली जात असल्याचं म्हटलं आहे. राणा दाम्पत्य मातोश्री बाहेर हनुमान चालीस पठण करण्यावर ठाम राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं राणांच्या जवळच्या व्यक्तीने म्हटलं आहे.
Hanuman Chalisa Row : “तुरुंगातील जेवण इतकं वाईट आहे का की, तुम्हाला घरचं जेवण हवंय?”; राणांना न्यायालयाचा सवाल
११ दिवसांपासून राणा दाम्पत्य तुरुंगात
नवनीत राणा, रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान शिवसेनेला दिलं होतं. त्यानंतर मुंबईत बराच राजकीय गदारोळ बघायला मिळाला. या प्रकरणात पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. तेव्हापासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा न्यायालयीन कोठडीत आहेत.
सध्या तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याने जामीनासाठी सत्र न्यायालयात याचिका केलेली आहे. त्यांच्या याचिकेवरील निकाल बुधवारी येणार आहे. सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला दिलासा मिळणार की, कोठडीतील मुक्काम वाढणार, याकडे अनेकांचं लक्ष आहे.
यापूर्वी बीएमसीने नोटीस बजावलेली काही प्रकरणे चांगलीच गाजली होती. अभिनेत्री कंगना रणौतच्या घरातील अवैध बांधकाम मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आलं होतं. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मोहित कंबोज यांनाही नोटीस देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता राणा दाम्पत्याचं प्रकरण समोर आलं आहे. राणांनी घरात अवैध काम केल्याच्या तक्रारीवरून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे.