'जिथं पाणी नाही तिथं...', अजित पवारांबाबत आनंदराज आंबेडकरांचं वादग्रस्त वक्तव्य VIDEO

Anandraj Ambedkar on Ajit Pawar : आनंदराज आंबेडकर यांनी दिवंगत अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. पत्रकारांच्या प्रश्नानंतर त्यांनी हे वक्तव्य उपरोधिक असल्याचे स्पष्टीकरण दिले.

ADVERTISEMENT

Anandraj Ambedkar on Ajit Pawar
Anandraj Ambedkar on Ajit Pawar
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांबाबत आनंदराज आंबेडकरांचं वादग्रस्त वक्तव्य VIDEO

point

पत्रकारांनी प्रश्न विचारताच दिलं स्पष्टीकरण

Anandraj Ambedkar on Ajit Pawar, जालना : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. जालन्यातील कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी पाणी आणि अजित पवार यांचा उल्लेख करत उपरोधिक विधान केले होते. या वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा : नाशिक : 'तर ती तुझी शेवटची तारीख', निवृत्त RTO अधिकाऱ्याने स्वत:वरच का झाडल्या गोळ्या?

"जिथे पाऊसच पडत नाही, तिथे..."

जालन्यात रिपब्लिकन सेनेचा 28 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील पाणीप्रश्नावर भाष्य केले. राज्यातील पाण्याचे योग्य नियोजन झाले पाहिजे, अशी भूमिका मांडताना त्यांनी कोकण, मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील पाण्याचा मराठवाडा आणि विदर्भासाठी वापर करण्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी, "जिथे पाऊसच पडत नाही, तिथे अजित दादाला आणायचं काय? आणि ते तलाव भरायचे?" असा सवाल केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. दिवंगत अजित पवार यांच्याबाबत अशा पद्धतीने उल्लेख केल्याने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला जात आहे.

हेही वाचा : 'विधानसभा अध्यक्षांकडून आदिवासींच्या जमिनी लाटण्याचे प्रयत्न', संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईला पुरवले जाणारे पाणी महाराष्ट्रातील इतर भागांपर्यंत पोहोचवावे - आंबेडकर 

आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या भाषणात मुंबईला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असल्याचे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्राला एका दिवसात जितके पाणी लागते, तितके पाणी मुंबईत एका दिवसात वापरले जाते, असा दावा त्यांनी केला. कोकणातील पाणी अडवून ते मुंबईला देण्याऐवजी इतर ठिकाणचे पाणी मुंबईला पुरवावे आणि सध्या मुंबईला पुरवले जाणारे पाणी महाराष्ट्रातील इतर भागांपर्यंत पोहोचवावे, असे ते म्हणाले. असे नियोजन केल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक इंच जमीन भिजू शकते, असेही त्यांनी भाषणात म्हटले. राज्यकर्ते शेतकऱ्यांचा विचार करत नसल्याची टीका करत त्यांनी 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा' या धोरणावरही प्रश्न उपस्थित केले. ज्या भागात पाऊसच पडत नाही, तिथे पाणी अडवून तलाव भरण्याचा काय उपयोग, असा सवाल त्यांनी केला. तसेच, 400 ते 500 फूट खोल गेलेल्या बोअरवेलमध्येही पाणी जिरत नसल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, भाषणातील अजित पवार यांच्या उल्लेखाबाबत पत्रकारांनी आनंदराज आंबेडकर यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपल्या विधानाचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचे सांगितले. "तो उल्लेख वेगळ्या पद्धतीने केला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने पाण्याच्या संदर्भात म्हटले होते, त्यामुळे हा उल्लेख केला. हे तलाव ओपन आहेत, तर त्यामध्ये पाणी कसे आणणार? त्यामुळे उपरोधिकपणे तो उल्लेख केलेला आहे," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. अजित पवार यांचा उल्लेख आपण उपरोधिक पद्धतीने केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या मूळ भाषणातील विधानामुळे निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर दिलेले स्पष्टीकरण यांची चर्चा सुरू झाली आहे.