ठाकरेंना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरणार? BMC च्या व्यवहारांवर संशय, ‘कॅग’ करणार चौकशी
मुंबई महापालिकेच्या विविध कामांची आता कॅग अर्थात नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) चौकशी केली जाणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने कॅगला चौकशी करण्याची विनंती केली होती. आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी ही खेळी असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये. कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप […]
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेच्या विविध कामांची आता कॅग अर्थात नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) चौकशी केली जाणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने कॅगला चौकशी करण्याची विनंती केली होती. आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी ही खेळी असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये.
ADVERTISEMENT
कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून आधीपासून केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी याबद्दल विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप केले होते.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेकडून झालेल्या १२ हजार कोटींच्या कामाची चौकशी करावी अशी विनंती कॅगकडे केली होती. कॅगने राज्य सरकारची विनंती मान्य केली असून, कॅग महापालिकेतल्या संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या कामांची चौकशी करणार आहे.
हे वाचलं का?
मुंबई महापालिकेतील कोणत्या कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप?
BMC Covid Centres Scam Allegation : कोविड सेंटर आणि वैद्यकीय सेवा पुरवण्याचे कंत्राटं मुंबई महापालिकेकडून कोरोना काळात देण्यात आले होते. मात्र, ही प्रक्रिया अपारदर्शकपणे करण्यात आल्याचा आरोप आहे. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस २६ जून २०२० रोजी कंत्राट दिलं गेलं, त्यावेळी या कंपनीची नोंदणीच झालेली नव्हती. या कंपनीला अपारदर्शक पद्धतीने १०० कोटींचं कंत्राट देण्यात आलं, असा आरोप आहे.
आपतकालीन वैद्यकीय परिस्थितीच्या नावाखाली कोरोना काळात खरेदी व्यवहारात बेसुमार भ्रष्टाचार झाल्याचा संशय सरकारला आहे.
ADVERTISEMENT
रेमडेसीविर खरेदीत घोटाळा?
कोरोना काळात मुंबई महापालिकेनं रेमडेसीविरची खरेदी १५६८ रुपये प्रती एक बॉटलने खरेदी केलं. जवळपास २ लाख रेमडेसीविरची खरेदी ७ एप्रिल २०२० रोजी करण्यात आली. तर दुसरीकडे याच दिवशी हाफकीन इन्स्टिट्यूटने रेमडेसीविरची ६६८ रुपये प्रती बॉटलने खरेदी केली होती. त्याचबरोबर मीरा भायंदर महापालिकेनंही रेमडेसीविरची याच दराने खरेदी केली होती. त्यामुळे बीएमसीच्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याचं दिसतंय, असाही आरोप आहे.
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेनं निशल्प रियल्टीज (अल्पेश अजमेरा) यांच्याकडून दहीसर येथे ३४९ कोटी रुपयांना जमीन खरेदी केली. अजमेरा यांनी हीच जमीन मस्करेहन्स आणि कुटुंबाकडून २.५५ कोटी रुपयांना विकत घेतल्याची बाब समोर आलीये. या जागा खरेदीला मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यात आता संबंधित विकासकाने न्यायालयात जाऊन ९०० कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. त्यामुळे याची चौकशी होणं गरजेचं असल्याचंही राज्य सरकारनं म्हटलंय.
ऑक्सिजन निर्मिती यंत्र खरेदी व्यवहाराचीही कॅग चौकशी
जून-जुलै, २०२१ मध्ये मुंबई महापालिकेनं विविध रुग्णालयांमध्ये प्राणवायू निर्मिती प्लांट उभारण्यात आले. यासाठी खरेदी करण्यात आली. १६ जून २०२१ रोजी ‘हायवे कन्स्ट्रक्शन’ कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. ही कंपनी काळ्या यादीत असल्याचं समोर आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांनीही या कंत्राटावर आक्षेप घेतला होता. या व्यवहारातही मोठा घोटाळा झाल्याचा संशय सरकारला आहे.
महापालिका कंत्राटात महापालिका अधिकाऱ्यांचा सहभाग
कोरोना काळात महापालिका अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कंत्राटाचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीये.आरटीपीसीआर चाचण्याचं कंत्राट अपारदर्शकपणे देण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. कुर्ला ‘एल’ वॉर्डमध्ये एका अधिकाऱ्यानं आपल्याच वडिलांशी संबंधित कंपनीला काम दिल्याचा आरोप असून, अशा सर्वच आरोपांची तपासणी करण्याची विनंती सरकारने ‘कॅग’ला माहिती आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT