नारायण राणेंना उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल; संत तुकारामांच्या अभंगाचा दिला दाखला

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत खडेबोल सुनावले. याचिकेवरील सुनावणी वेळी न्यायालयाने महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेचाही उल्लेख केला.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल न्यायालयाने “नारायण राणे यांनी वापरलेले शब्द योग्य नाहीत,” असं म्हणत महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय वारशाची आठवण करुन दिली. ‘मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन, हे लक्षात असू नये मी असतो तर त्यांच्या कानाखाली लगावली असती’ या नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यांवरुन त्यांच्याविरोधात महाराष्ट्रातील १० पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली आहे.

अमित शाहांना फोन केल्याचं नारायण राणे धडधडीत खोटं बोलले; पोलिसांची न्यायालयात माहिती

हे वाचलं का?

यापैकी धुळ्याच्या प्रकरणात नारायण राणे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल होऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात नारायण राणे यांनी याचिका दाखल केलेली आहे. याच याचिकेवरील सुनावणीवेळी नारायण राणे यांचे न्यायालयाने कान टोचले.

“एका जबाबदार पदावरील व्यक्तीनं दुसऱ्या जबाबदार पदावरील व्यक्तीबाबत वापरलेले शब्द योग्य नाहीत,” असं न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमुर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने म्हटलं.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरेलेले शब्द योग्य नाहीत, असं स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. हे निरिक्षण नोंदवत असतानाच खंडपीठानं “सल्ला देणं हे न्यायालयाच्या कक्षेत बसत नाही,” असंही स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे,’ असं सांगत न्यायमूर्तींनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला दिला. “शब्द धन वाटू जन लोका” या अभंगाच्या ओळीतून शब्द खूप महत्त्वाचे असतात आणि सामाजिक जीवनात ते जपून वापरायला हवेत,” असा सल्लाही न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी दिला.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अधिश बंगल्यावर मुंबई महापालिकेचा हातोडा?

ADVERTISEMENT

याबरोबरच राज्यातल्या राजकारणाच्या समृद्ध परंपरेचीही आठवण करुन दिली. “कितीही टोकाचे मतभेद असले तरी राजकीय व्यक्ती एकमेकांचा आदर करत आले आहेत. राज्यातल्या नेतेमंडळींनी युवांसमोर आदर्श ठेवायला हवा” असा सल्लाही दिला.

‘झालं गेलं विसरून जाऊ आणि एकमेकांशी सन्मानपूर्वक वागण्याचं ठरवू’ असं याचिकाकर्ते म्हणजेच नारायण राणे स्वतः पुढाकार घेऊन न्यायालयात का सांगत नाहीत?,’ असा सवाल न्यायालयाने यावेळी केला. त्याबरोबरच नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, असंही न्यायालयाने यावेळी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT