अकोले : कोरोनाने मोठ्या भावाला हिरावलं, दिराने विधवा वहिनीसोबत संसार थाटून दिला आधार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना महामारीने अनेक लोकांच्या घरावर संकटाचा डोंगर कोसळला. अनेक जणांनी या महामारीत आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावलं. कित्येक तरुण जोडीदारांच्या साथीदारांचा या कोरोनामुळे मृत्यू झाला. अहमदनगरच्या अकोले येथील शेटे कुटुंबात अशाच पद्धतीने दुःखाचे काळे ढग तयार झाले होते.

ADVERTISEMENT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेटे कुटुंबातील मोठा मुलगा निलेशचं निधन झालं. निलेश हा जव्हार येथील हिरपाडा भागात आश्रमशाळेत सेवेत होता. आश्रमशाळेतील मुलं आणि शिक्षकांना झालेल्या बाधेत निलेशलाही कोरोनाची लागण झाली. कोरोनामधून सावरत असताना निलेशच्या मेंदूत गाठ तयार झाल्याचं डॉक्टरांना समजलं. नाशिक येथे उपचारादरम्यान १४ ऑगस्ट २०२१ ला निलेशचं निधन झालं.

निलेशच्या निधनानंतर त्याची पत्नी पुनम आणि दीड वर्षाच्या लहान मुलीवर आभाळ फाटलं होतं. मोठ्या मुलाच्या निधनामुळे शेटे परिवार दुःखात असताना आपल्या सुनेच्या भविष्याची चिंता करुन गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी पुनमचा लहान दीर समाधानसोबत लग्न लाऊन देण्याचा प्रस्ताव समोर ठेवला.

हे वाचलं का?

विधवा पुनर्विवाहाला महाराष्ट्रात मोठी परंपरा लाभली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी आपलं आयुष्य वेचलं आहे. गावातील ज्येष्ठ व्यक्तींना दिलेल्या या प्रस्तावानंतर पुनमच्या माहेरच्या लोकांनीही यावर सकारात्मक विचार केला आणि यासाठी पुनमची मानसिक तयारी केली.

अखेरीस घरातील लोकांच्या उपस्थितीत ३० जानेवारीला अकोले येथील म्हाळादेवी खंडोबा मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला. समाजाचातील चालीरिती आणि प्रथांची बंधन झुगारून झालेल्या या विवाहसोहळ्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT