निवडणुकीला लोकांनी दिले पैसे; गुराखी झाला गावचा कारभारी
विकास राजूरकर, प्रतिनिधी (चंद्रपूर) Cowherd became the Sarpanch: चंद्रपूर: ‘जे राव करील ते गाव काय करील…’, अशी म्हण आपल्याकडे आहेच. आता याच म्हणीचा प्रत्यय चंद्रपूरमधील (Chandrapur) एका गावातही आला आहे. ते देखील ऐन ग्रामपंचायत निवडणुकीतच (Grampanchayat Election). ग्रामपंचायत म्हटलं की सगळे पक्ष बाजूला आणि भावकी समोर येते. अशा भावकीत कोण कोणाच्या विरोधात उभा राहिल याचा […]
ADVERTISEMENT
विकास राजूरकर, प्रतिनिधी (चंद्रपूर)
ADVERTISEMENT
Cowherd became the Sarpanch: चंद्रपूर: ‘जे राव करील ते गाव काय करील…’, अशी म्हण आपल्याकडे आहेच. आता याच म्हणीचा प्रत्यय चंद्रपूरमधील (Chandrapur) एका गावातही आला आहे. ते देखील ऐन ग्रामपंचायत निवडणुकीतच (Grampanchayat Election). ग्रामपंचायत म्हटलं की सगळे पक्ष बाजूला आणि भावकी समोर येते. अशा भावकीत कोण कोणाच्या विरोधात उभा राहिल याचा काही नेम नसतो, पण या सगळ्याला फाटा देऊन चंद्रपुरातल्या बामनी ग्रामपंचायतीनं एक नवा इतिहास घडवला आहे. चक्क गावातील गुराख्याला लोकवर्गणीतून गावाने सरपंच (Sarpanch) म्हणून निवडून आणलं आहे, आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, हे आपण जाणून घेऊया सविस्तर. (campaigning on bicycles people paid for elections cowherd became the sarpanch of the village)
चंद्रपूरच्या बल्लारपुरातील बामनी गावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर प्रचंड जल्लोष करण्यात आला. याचं कारणही खास आहे. या गावातील 55 वर्षीय प्रल्हाद बुधाजी आलाम यांना गावाने लोकवर्गणीतून सरपंच म्हणून निवडून दिलं आहे. प्रल्हाद हे एक गुराखी आहेत आणि शेतात मजुरी करतात, घरची परिस्थिती हलाखीची त्यामुळे गावातील शेतकऱ्यांची ढोरं राखून, शेतात मजुरी करुन, जे काही मिळेल त्याच्यातून आपल्या परिवाराचं पालन पोषण करतात.
हे वाचलं का?
Gram panchayat election results Live : ग्रामपंचायत निकालात कोणी मारली सरशी? पाहा आकडेवारी
गावतला भला माणूस, कुठलंही व्यसन नाही, लोकांच्या मदतीला धावून जाणारा अशी त्यांची ओळख आहे. का कोण जाणे गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि प्रल्हाद यांनी थेट सरपंचाची निवडणूक लढवायचं ठरवून टाकलं. त्यांनी सरपंच पदासाठी अपक्ष अर्जही भरला. विरोधात होते ताकदवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं पॅनल. तरीही प्रल्हाद यांनी एकटं सायकलवरुन फिरून प्रचार करणं, लोकांच्या भेटीगाठी घेणं असं सगळं सुरु केलं, हे सगळं गावातील तरुण पाहात होते, त्यांनीही हसायचं, टिंगल उडवायचं काम केलं, मात्र शेवटी त्याच तरुणांनी पुढाकार घेऊन प्रल्हाद आलामांना मदत केली.
ADVERTISEMENT
ग्रामपंचायत निवडणूक: भयंकर घटना.. विजयी मिरवणुकीवर दगडफेक, तरुणाचा मृत्यू
ADVERTISEMENT
गावातील होतकरू तरुण एकत्र आले आणि त्यांनीच लोकवर्गणीतून प्रल्हाद आलामांचा प्रचार सुरु केला. या सगळ्याचा फारच सकारात्मक असा परिणाम झाला आणि अनपेक्षितरित्यात निकाल प्रल्हाद आलमांच्या बाजूने लागला. आता याच प्रल्हादांचा पुढचा प्रवास कसा असणार हे पाहणं गरेजचं असेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT