‘CM ना हजर राहता येत नाही?’, अजितदादांचा पारा चढला; फडणवीस म्हणाले..

ADVERTISEMENT

Ajit Pawar will not make a speech in the Mahavikas Aghadi meeting to be held in Nagpur
Ajit Pawar will not make a speech in the Mahavikas Aghadi meeting to be held in Nagpur
social share
google news

Ajit Pawar Angry: नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) दररोज नवनव्या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला घेरत आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) अनुपस्थितीवरच प्रश्न उपस्थित करत प्रचंड संताप व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना देखील चुचकारलं. ज्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मिश्किलपणे उत्तर दिलं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदीमुळे रंगल्याचं पाहायला मिळालं. (cant chief minister attend the question ans hour ajit pawar temper rose devendra fadnavis gave a funny answer)

दरम्यान, या सगळ्यात खरं तर अजित पवार हे मुख्यमंत्री शिंदेंवर प्रचंड संतापलेले दिसून आले पण त्याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं देखील कौतुक केलं. अजित पवार आणि फडणवीसांची जवळीक ही काही आता नवी गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळेच आता आजच्या घटनेनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अजितदादा आणि फडणवीसांबाबत एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

अजित पवार संतापले… काढलं संजय राठोडांना अडचणीत आणणारं प्रकरण

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवार संतापले… फडणवीस म्हणाले, आम्हाला तर वाटलं तुम्ही..

प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर नसल्याने अजित पवारांचा पारा चांगलाच चढला. पण यावेळी देवेंद्र फडणवीसांनी बाजू सावरत सभागृहातील वातावरण देखील खेळीमेळीचं ठेवलं. पाहा नेमकं दोघांमध्ये काय संभाषण झालं.

ADVERTISEMENT

अजित पवार: प्रश्नोत्तराचा आता दुसरा आठवडा आणि दुसरा दिवस आहे. मी बरेच दिवस सभागृहात काम करतोय. आज जवळपास मुख्यमंत्र्यांकडे 14 ते 15 खाती आहेत आणि त्याची उत्तरं शंभूराज देसाई आणि उदय सामंत देत आहेत. कोणी उत्तरं द्यायची तो ज्याचा-त्याचा अधिकार आहे. परंतु देवेंद्रजी आपल्याकडे पण सात ते आठ खाती आहेत. आपण सगळ्या खात्यांची उत्तरं देता. त्यामध्ये उत्तरं द्यायलं दुसरं कोणी तुम्ही नेमत नाही. तुम्ही सक्षम आहात म्हणून तुम्ही तसं करता.

ADVERTISEMENT

अहो एक मिनिट.. तुम्ही ऐकून का घेत नाही.. तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचीच बाजू मांडत असतात. हेतू आरोप नाही.. आम्ही एवढंच म्हणतोय की, या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री महोदय जर हजर असतील तर प्रशासनावर पण एक दबदबा निर्माण होतो. कारण सगळे जणं 30-40 दिवस प्रश्न आधी विचारत असतात. एखाद्या दिवशी दिल्लीला महत्त्वाचं काम आहे त्यावेळेस गेले तर आम्ही समजू शकतो. किंवा एखाद्या दिवशी आणखी काही महत्त्वाच्या कामाकरिता विधानपरिषदेत थांबले तर आम्ही समजू शकतो. पण नगरविकास खातं याबाबत जेव्हा आमदार प्रश्न उपस्थित करतात.

उल्हासनगरचा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित आहे. सांगता-सांगता उदय सामंतांनी असं सांगितलं की, हे जलसंपदाकडे आहे. तेच जर उत्तर एकनाथ शिंदेंकडून आलं असतं. तर राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी जलसंपदेचं पण उत्तर दिलं असतं.

कारण उल्हासनगरचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी शासन कोणती ठोस उपाययोजना करणार आहे? यामध्ये शासन आणि महापालिका यांच्यातील ढिसाळ नियोजनामुळे उल्हासनगर महापालिकेमध्ये दीडपट दंडाची आकारणी करुन पाणी मिळतंय. तर दंडाची रक्कम ही उल्हासनगरच्या नागरिकांकडून वसूल केली जात आहे. त्यांचा काय दोष आहे?

म्हणून आमचं म्हणणं आहे की, या दोन प्रश्नांची उत्तरं द्यावीच. परंतु आपणही विधानसभेचे अध्यक्ष आहात आणि सभागृहात देवेंद्र फडणवीस तुम्हालाही आठवत असेल.. अनेक मुख्यमंत्री झाले.

मुख्यमंत्री हे प्रश्नोत्तराच्या तासाला थोडंसं हजर असले की, इतरांचे प्रश्न असतील तर त्यातही हस्तक्षेप करुन ते न्याय देऊ शकतात. आपण पाच वर्षात तसं करत होता. मागे पण वेगवेगळे मुख्यमंत्री तसं करत होते.

ही एक पंरपरा आहे, पद्धत आहे. एवढ्या मोठ्या विधीमंडळाला एक मानसन्मान आहे. आपण कायदे करतो, कायदेमंडळ आहे. त्यामुळे याबाबतची नोंद सरकार घेणार आहे का? याचंही उत्तर आम्हाला मिळावं?

Ajit Pawar: ‘हा निर्लज्जपणाचा कळस…’, सत्तारांवर अजित पवार संतापले!

देवेंद्र फडणवीस: नाही.. निश्चित मुख्यमंत्री उपस्थित राहतील. आज देखील मुख्यमंत्री उपस्थित राहिले असते. पण आम्हाला माहितीच नव्हतं की, तुम्ही सभागृह चालू देणार आहात. आता तुम्ही चालवत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवतो. आपलं म्हणणं योग्य आहे. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहतील.

अजित पवार: मग आपण कसं काय आला?, आपल्याला बरं माहिती असतं सभागृह चालणार आहे. जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना माहिती असतं. ते तर गृह विभागाचे मंत्री आहेत. त्यांचं काम नाही का.. की, मुख्यमंत्र्यांच्या पण लक्षात आणून द्यायचं.

देवेंद्र फडणवीस: मला वाटलं सभागृह चालतच नाही. पण चालतंय असं लक्षात आल्यावर घाईघाईने मी आलो.

अशी जुगलबंदी यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये पाहायला मिळाली. ज्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यात हस्तक्षेप करुन या घटनेची नोंद घेण्यात आल्याचं सांगत पुढील कामकाजास सुरुवात केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT