अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा; सोनिया गांधींबद्दल केलेल्या ट्विटमुळे अडचणीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेल्या ट्विटमुळं भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भातखळकर यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याची तक्रार पुण्यातील सायबर पोलिस स्टेशमध्ये देण्यात आली होती. त्यानुसार आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात पुणे सायबर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंगप्रकरणी समन्स बजावले होते. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. त्याचं कारण म्हणजे सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. यावरून आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली होती. ट्विटच्या माध्यमाने त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला होता.

अतुल भातखळकरांनी काय केलं होतं ट्विट?

सोनिया गांधी यांना समन्स आल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यावर हा तर कोरोनाचा ईडी व्हेरियंट आहे, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला होता. या आक्षेपार्ह ट्विटनंतर काँग्रेस नेत्यांना ते आवडलं नव्हतं. याप्रकरणी पुण्यातील संदीप उदमले यांनी पुण्यातील सायबर पोलिसात आक्षेपार्ह आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. ज्यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. याचीच दखल घेत पुणे सायबर पोलिसांनी अतुल भातखळकर यांच्याविरोधात भादंवि 500 प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

हे वाचलं का?

ट्विटमुळं अडचणीत

अतुल भातखळकर हे विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अनेकवेळा ते विरोधकांवर निशाणा साधत असतात. ट्विटच्या माध्यमाने देखील त्यांनी अनेकवेळा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर संधान साधले आहे. मात्र सोनिया गांधी यांच्या विरोधात केलेलं ट्विट त्यांना महागात पडत आहे. आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT