पुणे : चांदणी चौकातील पूल ट्विन टॉवर्स जमीनदोस्त करणारी NCC कंपनीच पाडणार

मुंबई तक

काही दिवसांपूर्वी पुण्यातील चांदणी चौकात नागरिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी चांदणी चौकात जाऊन पाहणी केली होती. तसेच चौकातील पूल पाडण्याच्या निर्णय घेतला होता. आता हालचाली सुरू झाल्या असून, ट्विन टॉवर्स पाडणाऱ्या कंपनीकडूनच हा पूल पाडला जाणार आहे. पुण्यातील चांदणी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुद्दा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

काही दिवसांपूर्वी पुण्यातील चांदणी चौकात नागरिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी चांदणी चौकात जाऊन पाहणी केली होती. तसेच चौकातील पूल पाडण्याच्या निर्णय घेतला होता. आता हालचाली सुरू झाल्या असून, ट्विन टॉवर्स पाडणाऱ्या कंपनीकडूनच हा पूल पाडला जाणार आहे.

पुण्यातील चांदणी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवल्यानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आला. चांदणी चौकातील पूलामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचं एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. त्यानंतर पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

supertech twin tower demolition : 800 कोटींची 32 मजली टॉवर्स बिल्डरला का पाडावी लागली?

ट्विन टॉवर्स जमीनदोस्त करणारी कंपनीच पाडणार चांदणी चौकातील पूल

मिळालेल्या माहितीनुसार चांदणी चौकातील पूल उडवण्याचं काम एनसीसी (NCC) म्हणजे नागार्जून कंन्स्ट्रक्शन कंपनी (Nagarjun construction company) करणार आहे. याच कंपनीकडे दिल्लीतील ट्विन टॉवर्स पाडण्यासाठीचं ब्लास्टिक करण्याचं काम होतं.

नागार्जून कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून आता पूलाची पाहणी केली जाणार आहे. कंपनीचे अधिकारी चांदणी चौकातील या पूलाची गुरूवारी (१ सप्टेंबर) दुपारी पाहणी करणार आहे.

ट्विन टॉवर्स बनले ढिगारा! सुपरटेकने किती पैसे गुंतवले होते? पाडण्यासाठी किती आला खर्च?

एकनाथ शिंदेंचा चांदणी चौकात अडवण्यात आला होता ताफा

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे मार्गे जात असताना चांदणी चौकात वाहतूक थांबवण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार असल्यानं वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवत नाराजी व्यक्त केली होती.

चांदणी चौक वाहतूक कोंडी : एकनाथ शिंदेंनी घेतला पूल पाडण्याचा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंतर चांदणी चौकात जाऊन पाहणी केली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. चांदणी चौकातील वाहतूक कोंडींचा प्रश्न सोडवण्यासाठी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला होता.

त्यानंतर यादृष्टीने प्रशासनाकडून पावलं उचलली जात असून, स्फोटक लावून हा पूल पाडला जाणार आहे. याचं काम नागार्जून कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलं जाणार आहे. नागार्जून कंन्स्ट्रक्शन कंपनीनेच ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी स्फोटकं लावण्याचं काम केलं होतं. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाणार असून, त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp