या सरकारमधील लोकांकडे पैसे खाण्याचं स्कीलसुद्धा नाही: चंद्रकांत पाटील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: ‘या सरकारमध्ये पैसे खाण्याशिवाय कुणालाच काही कळत नाही. पण पैसे खाण्याचं स्कीलसुद्धा यांच्याकडे नाही.’ असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद बोलावली होती. ज्यावेळी त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीवर बरीच टीका केली.

ADVERTISEMENT

पाहा चंद्रकांत पाटील नेमकं काय-काय म्हणाले:

किरीट सोमय्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप केल्यानंतर मुश्रीफांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या मागचे मास्टरमाईंड हे चंद्रकांत पाटील असल्याचं म्हटलं आहे. ज्यानंतर चंद्रकांत पाटलांनी देखील पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे.

हे वाचलं का?

‘पैसे खाण्याचं स्कीलसुद्धा यांच्याकडे नाही’

‘मी सांगू तुम्हाला.. या सरकारमध्ये पैसे खाण्याशिवाय कुणालाच काही कळत नाही. पैसे खाताना सुद्धा दरोडा घालतात ना.. म्हणजे ते कौशल्य वापरतात ना. त्यामुळे खूप काळ ते लोकं सापडत नाही. पण पैसे खाण्याचं स्कीलसुद्धा यांच्याकडे नाही. त्यामुळे एखादी गोष्ट करायची असेल तर ती कसी वेल प्रूफ करायची, ही कोर्टात चॅलेंज होणार आहे, कोर्ट हाणणार आहे याची कोणाला काळजी नाही. बेभरवशी हे सरकार चाललं आहे.’ असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

‘हसन मुश्रीफांना ईडीला स्पष्टीकरण द्यावंच लागेल’

‘हसन मुश्रीफांनी जिल्ह्यातील राजकारण बाजूला ठेवावं. आता त्यांना ईडीला स्पष्टीकरण द्यावंच लागणार आहे हे लक्षात ठेवावं. सोमय्यांनी केलेल्या आरोपानुसार, संबंधित कारखान्यांमध्ये पैसे कुठून आले होते. हे त्यांना ईडीला सांगावं लागणार आहे. तसंच ज्या लोकांच्या माध्यमातून हे मनी लाँड्रिंग झालं ते अगदीच सामान्य होते. तीन सामान्य लोकांच्या माध्यमातून हे मनी लाँड्रिंग झालेलं आहे. ज्यापैकी एक जण गेला. त्यामुळे जे दोन जण उरले आहेत त्यांना कोल्हापूर पोलिसांनी संरक्षण द्यावं.’ अशी मागणी देखील चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

‘शरद पवार अशा चिल्लर विषयात पडणार नाहीत’

दरम्यान, या प्रश्नी शरद पवार आपल्या नेत्यांना पाठिशी घालत आहेत का? असा सवाल पत्रकारांनी चंद्रकांत पाटीला यांना केला असता ते म्हणाले की, ‘जिथवर मी शरद पवारांना ओळखतो त्यानुसार पवार साहेब हे अशा प्रकारच्या गोष्टीला पाठिशी घालणार नाहीत. त्यांनी मुश्रीफांच्या भेटीमध्ये सांगितलं असेल की, ‘ऑन पेपर दिसतं आहे की, तुम्ही कलकत्त्याहून एंट्री आणल्या आहेत. यात मी काहीही करु शकत नाही.’

‘म्हणूनच मुश्रीफांची तब्येत बिघडली असेल. कारण पवारच आपल्या पाठिशी राहणार नसतील तर आपलं काय? अशी भीती मुश्रीफांना वाटत असेल. पण पवार साहेब अशा चुकीच्या गोष्टींच्या मागे उभे राहणार नाहीत. पवार साहेबांनी आतापर्यंत मोठं राजकारण केलं आहे ते चिल्लर विषयात कधी पडले नाहीत.’ असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘महाविकास आघाडीला कोर्टाकडून फटके खाण्याची सवय’

महाविकास आघाडीला प्रत्येक विषयात कोर्टाकडून फटके खाण्याची सवय झाली असल्याचं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. ‘राणेंच्या विषयात देखील तक्रार महाडमध्ये दाखल झाली. गुन्हा नाशकात.. नाशिक पोलीस निघाले काय झालं.. दोन मिनिटात जामीन झाला. गेल्या काही दिवसात कोर्टाकडून फटके खाण्याची या सरकारला सवय झाली आहे.’ असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

चंद्रकांत पाटील खरे मास्टरमांईड… सोमय्यांचा टूल म्हणून वापर; हसन मुश्रीफांचा पलटवार

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी यावेळी असंही म्हटलं की, पुढील आठवड्यात किरीट सोमय्या हे मुश्रीफांविरोधात आणखी एक आरोप करणार आहेत आणि तो खूपच गंभीर असेल. तसंच यावेळी फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेसच्या दोन बड्या मंत्र्याचे देखील काही विषय आपण समोर आणणार आहोत. असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्रं पाहायला मिळणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT