भाजपमधला ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जातात चंद्रशेखर बावनकुळे, असा आहे राजकीय प्रवास
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्याकडे असलेलं प्रदेशाध्यक्ष पद आशिष शेलार यांना दिलं जाईल अशी चर्चा होती. मात्र प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे. आशिष शेलार हे आधी मुंबईचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे तीच जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा […]
ADVERTISEMENT

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्याकडे असलेलं प्रदेशाध्यक्ष पद आशिष शेलार यांना दिलं जाईल अशी चर्चा होती. मात्र प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे. आशिष शेलार हे आधी मुंबईचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे तीच जबाबदारी देण्यात आली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा राजकीय प्रवास कसा आहे?
चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्म १३ जानेवारी, १९६९ ला झाला. त्यांचं जन्मस्थान कामठी तालुक्यातील खसाळा आहे. BSC पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती ज्योती बावनकुळे.
अपत्ये : संकेत बावनकुळे व सौ पायल आष्टणकर










