Cheetah: भारतातील चित्त्यांची संख्या वाढणार
भारतात याआधी दक्षिण आफ्रिकेतून 8 चित्ते आले आहेत. यावेळी आणखी 12 चित्ते येत आहेत. आज (18 जानेवारी) मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात हे चित्ते पोहोचतील. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी चित्ता आणतानाचे फोटो ट्विटरवर शेअर करत ही माहिती दिली. मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं, ‘भारतीय हवाई दलाच्या विशेष विमान C-17 […]
ADVERTISEMENT

भारतात याआधी दक्षिण आफ्रिकेतून 8 चित्ते आले आहेत. यावेळी आणखी 12 चित्ते येत आहेत.
आज (18 जानेवारी) मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात हे चित्ते पोहोचतील.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी चित्ता आणतानाचे फोटो ट्विटरवर शेअर करत ही माहिती दिली.
मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं, ‘भारतीय हवाई दलाच्या विशेष विमान C-17 ग्लोबमास्टरमधून हे 12 चित्ते येणार आहेत.’
दक्षिण आफ्रिकेतील या 12 चित्त्यांमध्ये ७ नर आणि ५ माद्या आहेत.
चित्त्यांना ग्वाल्हेर विमानतळावरून श्योपूर येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये विशेष विमानाने नेले जाईल. नंतर क्वारंटाईन एन्क्लोजरमध्ये ठेवण्यात येईल.
कुनोमध्ये याआधी नामिबियातून 8 चित्ते आणण्यात आले. ज्यांचे फोटो-व्हिडीओ आपण पाहिलेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मंत्री भूपेंद्र यादव चित्यांच्या स्वागतासाठी आज उपस्थित राहणार आहेत.