भातखळकरांचं भुजबळांबद्दल ट्विट, जयंत पाटलांनी फडणवीसांकडे केली तक्रार
भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा सांताक्लॉजची टोपी घातलेला फोटो ट्विट करत खोचक टोला लगावला. मात्र, याच फोटोमुळे अतुल भातखळकर अडचणीत आलेत. छगन भुजबळाचा मार्फ्ड केलेला फोटो विधानसभेत दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी थेट कारवाईची मागणी केली. त्याला फडणवीसांनी उत्तर देत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन […]
ADVERTISEMENT

भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा सांताक्लॉजची टोपी घातलेला फोटो ट्विट करत खोचक टोला लगावला. मात्र, याच फोटोमुळे अतुल भातखळकर अडचणीत आलेत. छगन भुजबळाचा मार्फ्ड केलेला फोटो विधानसभेत दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी थेट कारवाईची मागणी केली. त्याला फडणवीसांनी उत्तर देत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा एक फोटो भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केला. या फोटोत छगन भुजबळ यांच्या डोक्यावर सांताक्लॉजची टोपी दाखवण्यात आलीये. भातखळकर यांनी ट्विट केलेल्या फोटो हा मूळ फोटो नसल्याचं समोर आलं.
मंगळवारी (20 डिसेंबर) छगन भुजबळ हे विधिमंडळ परिसरात दाखल झाले. त्यावेळी ते काँग्रेसचे नेते भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि शशिकांत शिंदे यांच्यासोबत बोलत उभे होते. त्यावेळी हे फोटो काढण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर सांताक्लॉजची टोपी नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.
भूखंडाचा श्रीखंड… विरोधक शिंदेची पाठ काही सोडेना!










