मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रूग्णालयातून 21 दिवसांनी डिस्चार्ज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यामुळे त्यांना मुंबईतल्या एच. एन. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 12 तारखेला त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. 10 नोव्हेंबरला ते रूग्णालयात दाखल झाले होते. आज 21 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

ADVERTISEMENT

एचएन रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली होती. गुरुवारी केलेल्या तपासण्यांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी सर एच एन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे असे रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई यांनी अधिकृतरित्या सांगितले. पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

हे वाचलं का?

रुग्णालयात असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले होते. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून करोनाचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. त्यामुळे या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच प्रकृती बरी होईल अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवदेनात नमूद केले होते.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) HN रिलायंन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आधी वरिष्ठ आर्थो सर्जन डॉक्टरांच्या सल्ल्यानं विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT