‘हे कोणीही कधीही विसरू नये’, चित्रा वाघांनी चाकणकरांना पुन्हा डिवचलं
उर्फी जावेदच्या (Urfi Javed) वेशभूषेवरून सुरू झालेला वादाने महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Politics) स्वरूप घेतलं आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांविरुद्ध आक्रमक झालेल्या चित्रा वाघांनी (Chitra Wagh) महिला आयोगाच्या माध्यमातून अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना लक्ष्य केलं. त्यानंतर रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक वार-पलटवार होताना दिसत आहे. दरम्यान, चित्रा वाघांना राज्य महिला आयोगाने (maharashtra […]
ADVERTISEMENT
उर्फी जावेदच्या (Urfi Javed) वेशभूषेवरून सुरू झालेला वादाने महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Politics) स्वरूप घेतलं आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांविरुद्ध आक्रमक झालेल्या चित्रा वाघांनी (Chitra Wagh) महिला आयोगाच्या माध्यमातून अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना लक्ष्य केलं. त्यानंतर रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक वार-पलटवार होताना दिसत आहे. दरम्यान, चित्रा वाघांना राज्य महिला आयोगाने (maharashtra women’s commission) नोटीस बजावण्यात आली. त्याला उत्तरही चित्रा वाघांनी उत्तर दिलं असून, त्यानंतर केलेल्या ट्विटमधून पुन्हा एकदा चाकणकरांना डिवचलंय.
ADVERTISEMENT
तोकडे कपडे घालून मुंबईत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघांनी केलेली आहे. मुंबई पोलिसांकडे तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही चित्रा वाघांनी केलीये. त्याचबरोबर महिला आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करण्याची भूमिका चित्रा वाघांनी मांडली होती. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्या सुप्त संघर्ष सुरू झाला.
चित्रा वाघांनी महिला आयोगाला सवाल केले होते. त्यानंतर महिला आयोगाने चित्रा वाघांना नोटीस बजावली होती. या नोटिसीला चित्रा वाघांनी उत्तरही दिलं. उत्तर दिल्यानंतर एक ट्विट चित्रा वाघ यांनी केलंय.
हे वाचलं का?
ऊर्फीला अंगप्रदर्शन भोवणार? चित्रा वाघ भेटल्या पोलीस आयुक्तांना, म्हणाल्या…
महिला आयोगाची नोटीस : चित्रा वाघांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
“खुल्या समाजात उघडा नंगानाच सार्वजनिक जागांवर स्वैराचार याविरोधातील माझा लढा सुरूच राहणार. आपण समाजाचं देणं लागतो हे कोणीही कधीही विसरू नये. कर्तव्य म्हणून जबाबदारी मिळते ती जाणीव राखून टिकवायची असते. कर्तृत्व हे शाब्दिक नाही तर कृतीनंच असायला हवं. महिला आयोगाचा कायम सन्मान. दिलंय नोटिशीचं उत्तर”, असं चित्रा वाघांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT
खुल्या समाजात उघडा नंगानाच सार्वजनिक जागांवर स्वैराचार याविरोधातील माझा लढा सुरूच राहणार
आपण समाजाचं देणं लागतो हे कोणीही कधीही विसरू नये
कर्तव्य म्हणून जबाबदारी मिळते ती जाणीव राखून टिकवायची असते
कर्तृत्व हे शाब्दिक नाही तर कृतीनंच असायला हवं….(१/३)
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 8, 2023
‘उर्फी’वरून भिडल्या! रुपाली चाकणकर चित्रा वाघांना म्हणाल्या ‘गांधारी’
ADVERTISEMENT
“मला नोटीस दिली हे जसं जाहीर सांगितलं. दिलेली नोटीस वितरित केली, तसंच हे उत्तरही सार्वजनिक करायला माझी काहीच हरकत नाही. स्वैराचाराला लगाम घालणं ही फक्त माझीच जबाबदारी नाही, तर कायद्यानं स्थापित झालेल्या महिला आयोगाचीही आहेच. माझा लढा सुरूच राहणार… जय हिंद…जय महाराष्ट्र”, अशी भूमिका मांडत चित्रा वाघांनी पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांना डिवचलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT