Maharashtra Rain: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात ढगफुटीसदृष्य पाऊस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जळगाव: राज्याच्या विविध भागांमध्ये काल रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. मराठवाडा, विदर्भ आणि जळगाव जिल्ह्यात पावसाने पहिल्याच फटक्यात दाणादाण उडवून दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृष्ट पाऊस झाल्यामुळे हा भाग पुराच्या पाण्याने वेढला गेला आहे.

ADVERTISEMENT

गिरणा, तितूर आणि डोंगरी या तिन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावातील 63 वर्षीय वृद्धा कलाबाई पांचाळ या वाहून गेल्या आहेत. चाळीसगाव शहरासह आजूबाजूच्या वाकडी, रोकडे, वाघडू, वाघळी, खिर्डे, लोंजे, जांभळी, मुंदखेडे, रहिपुरीसह १५ गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. तसेच या पुराच्या पाण्यात शेकडो गुरं वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

काही गावांमध्ये लोक अडकले असून, त्यांना रेस्क्यू करण्यासाठी एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. या पथकात 35 जणांचा समावेश असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी दिली आहे. पुराच्या घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण, माजीमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, तहसीलदार अमोल मोरे आदींसह इतर विभागाचे अधिकारी चाळीसगावात दाखल झाले आहेत. पिंपरखेड या गावी पुराच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह वाहून आला असून, त्याची ओळख पटलेली नाही.

Rain update : पावसाचा तडाखा! राज्यात सात जणांचा मृत्यू, कन्नड घाटात दरड कोसळली

ADVERTISEMENT

छत्तीसगड वर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम महाराष्ट्रासह राज्यावर दिसून येत आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. उद्याही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान विभागाने ठाणे, पालघरसह राज्यातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

नाशिक, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यलो अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे…

पुणे, रत्नागिरी, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT