मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी, अजित पवारांचा टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्यामुळे नाही म्हटलं तरी विकासकामं ठप्प झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरचा कामाचा भार वाढल्याने ते आजारी पडले आहेत असा टोला आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर कामांची विभागणी झाली असती, पालकमंत्र्यांच्या नेमणुका झाल्या असत्या तर कामं वाटली गेली असती. ४२ मंत्र्यांच्या नेमणुका झाल्या असत्या तर लोकांचे प्रश्न मार्गी लागले असते असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवढे दोघंच जण सरकारमध्ये आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत बिघडली कारण कामाचा भार त्यांच्यावरच पडतोय. मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळेच ते आजारी झाले आहेत. सध्या सगळी जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याचकडे आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असले तरीही त्यांच्याकडे कुठलंही खातं नाही. खातं मिळाल्यावरच ते आदेश देऊ शकतात. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हटलं आहे अजित पवार यांनी ?

सरकारं येतात आणि जात असतात. मात्र विकासकामं झाली पाहिजेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यापासून विकासाच्या कामांना स्थगिती देण्याचं काम सुरू आहे. ही कामं जनतेची होती, कुणाचीही व्यक्तिगतं कामं नाहीत, तरीही स्थगिती देण्यात आली. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीला देखील स्थगिती दिली असं महाराष्ट्रात घडलं नव्हतं. महाविकास आघाडी सरकारने खूप चांगले निर्णय घेतले होते. मात्र शिंदे सरकार हे निर्णय कोणत्या मानसिकेतून बदलतं आहे हे बघावं लागेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे विकासाला खिळ बसणार आहे. आम्ही पदावर होतो तेव्हा हे सांगतात वेळेचे नियम मोडून चालत नाही. आम्ही सांगतो नियमाने वागा, आम्ही सांगतो दहाच्या पुढे स्पीकर बंद. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फिरत असताना आता दीड दोन वाजेपर्यंत फिरतात. सभा घेतात पोलिसांना सांगावं तर पोलिसांना आदेश देणारेच नियम तोडत असतील तर पोलिसांनी काय करावं? म्हणून मध्ये राज्यपालांना भेटून सांगितलं की तुम्ही समजावून सांगा. प्रत्येकाला पक्ष गट वाढविण्याचा अधिकार आहे. पण त्या अधिकाराचे कायद्याने, संविधानाने सांगितलेल्या तंतोतंत नियमांचे पालन केले गेले पाहिजे. मग तो किती मोठा माणूस असो किंवा शेवटचा घटकाचा माणूस असो असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT