Eknath Shinde: सत्यजीत तांबेंबाबत CM शिंदेंचा मोठा दावा, म्हणाले…
Eknath Shinde Claim on Satyajeet Tambe: वर्धा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (3 फेब्रुवारी) माध्यमांशी संवाद साधताना नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) अपक्ष निवडून आलेल्या सत्यजीत तांबेंबाबत (Satyajeet Tambe) एक मोठा दावा केला आहे. एकीकडे सत्यजीत तांबेंनी आपली राजकीय भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नसताना दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंनी मात्र, नाशिकची जागा ही […]
ADVERTISEMENT
Eknath Shinde Claim on Satyajeet Tambe: वर्धा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (3 फेब्रुवारी) माध्यमांशी संवाद साधताना नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) अपक्ष निवडून आलेल्या सत्यजीत तांबेंबाबत (Satyajeet Tambe) एक मोठा दावा केला आहे. एकीकडे सत्यजीत तांबेंनी आपली राजकीय भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नसताना दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंनी मात्र, नाशिकची जागा ही भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) यांच्या मदतीनेच निवडून आल्याचा थेट दावा केला आहे. (cm shinde has claimed that satyajeet tambes victory was due to alliance between bjp and balasahebanchi shiv sena party)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी वर्ध्यात आले होते. तिथेच त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्यजीत तांबेंबाबत भाष्य केलं.
पाहा एकनाथ शिंदे नाशिकच्या जागेबाबत नेमकं काय म्हणाले:
‘ही एक विशिष्ट प्रकारची निवडणूक होती. महाविकास आघाडीकडे तीन जागा होत्या आणि भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीकडे दोन जागा होत्या. त्या दोन जागा आपल्याला माहिती आहे की, कोकणातील जागा आपण जिंकली. नाशिकमधील देखील जागा भाजप आणि शिवसेनेच्या मदतीने त्या ठिकाणी जिंकलेली आहे. पण ज्या काही जागा यायला हव्या होत्या. त्या आल्या नाहीत याची नक्कीच कारणमीमांसा केली जाईल. त्यावर देखील विचार करून सुधारणा केली जाईल.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
MLC Election Results 2023 : ‘3 विरुद्ध 1’; विधान परिषद निकालात ‘मविआ’ची सरशी
‘जुन्या पेन्शनच्या बाबतीत देखील आमचे येथे शिक्षणमंत्री आहेत. त्यावर आमचा विभाग काम करतोय. त्याच्यावर नक्की विचार सुरू आहे. सरकार सर्व घटकांना न्याय देणारं सरकार आहे. शेवटी हे सरकार विकासावर देखील भर देणारं आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या समस्या देखील सोडवणारं आहे. शिक्षकांना 1100 कोटी रुपये दिले ना आम्ही. त्यामध्ये शिक्षक हे देखील आमचेच आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी जे केलेलं आहे त्याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मात्र, जुन्या पेन्शनबाबत त्यांनी कोणतंही ठोस असं उत्तर दिलेलं नाही.
ADVERTISEMENT
सरकारमध्ये अजिबात अस्थिरता नाही!
‘बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीमध्ये अस्थिरता आहे असं म्हटलं आहे. आमच्याकडे 170 आमदार आहेत. तर 170 आमदार असल्यामुळे हे सरकार स्थिर हे सांगण्याची मला आवश्यकता नाही. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल आणि या राज्यातील जनतेला न्याय देईल आणि पुढच्या निवडणुकीत देखील हेच सरकार पुन्हा येईल.’ असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे.
ADVERTISEMENT
Amravati MLC Election : धीरज लिंगाडेंनी ३० तासांनंतर उधळला गुलाल! भाजपला धक्का
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबेंनी मारली बाजी
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली आहे. पाचव्या फेरी अखेर तांबे यांना तब्बल 68 हजार 999 मतं मिळाली तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं पडली. त्यामुळे या निवडणुकीत सत्यजीत तांबेंनी तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी मिळवला आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांना मात्र मोठा पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत विजयासाठीचा कोटा 58 हजार 310 होता. जो तांबेंनी सहजपणे पूर्ण केला.
मात्र, या निवडणुकीआधी सत्यजीत तांबेंबाबत झालेल्या एकूण राजकारणातनंतर ते आता भाजपमध्ये जाणार की, पुन्हा काँग्रेस त्यांना सामावून घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT