Omicron Variant : नव्या व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रही सतर्क! मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

मुंबई तक

कोरोनाच्या दोन लाटांनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Omicron Variant) जगभरात भीतीचं सावट पसरलं आहे. इतर देशाप्रमाणेच भारतानंही सावध पावलं उचलण्यास सुरूवात केली असून, महाराष्ट्रातही सरकार आणि प्रशासनही सर्तक झालं आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याचं समोर येताच सरकारने नव्याने निर्बंध लागू केले असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाच्या दोन लाटांनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Omicron Variant) जगभरात भीतीचं सावट पसरलं आहे. इतर देशाप्रमाणेच भारतानंही सावध पावलं उचलण्यास सुरूवात केली असून, महाराष्ट्रातही सरकार आणि प्रशासनही सर्तक झालं आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याचं समोर येताच सरकारने नव्याने निर्बंध लागू केले असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट (उत्परिवर्तित विषाणूचा प्रकार) आढळला असून, तो डेल्टापेक्षाही घातक असल्याचं सांगितलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं असून, व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित केलं आहे. यामुळे जगभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही देशांनी प्रतिबंधात्मक उपायांचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेसह त्या खंडातील सहा देशांतील प्रवासावर निर्बंध जारी केले आहेत.

कोरोना प्रतिबंधक नियम मोडल्यास 10 हजारापर्यंत होणार दंड, राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

भारतातही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरूवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी बैठक घेतली. महाराष्ट्र सरकारने तातडीने काही निर्बंध लागू केले असून, आफ्रिकन देशांसह परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन आणि चाचण्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये डेल्टापेक्षाही अधिक म्युटेशन आढळून आल्यानं त्यांच्या संसर्गाचा वेग प्रचंड असल्याचं शास्त्रज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp