Sonia Gandhi यांनी बोलावली UPA ची बैठक, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑगस्टला म्हणजेच आज संध्याकाळी चार वाजता एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ही बैठक ऑनलाईन होणार आहे. या बैठकीसाठी चार राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]
ADVERTISEMENT

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑगस्टला म्हणजेच आज संध्याकाळी चार वाजता एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ही बैठक ऑनलाईन होणार आहे. या बैठकीसाठी चार राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन अशी ही चार नावं आहेत.

भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासोबत जात सत्ता स्थापन केली. आता उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने येत्या काळात शिवसेना हा युपीएचा म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटकपक्ष होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. इतकंच नाही तर आता आगामी काळात भाजपसोबत युती होण्याच्या सगळ्या शक्यता धूसर झाल्या आहेत का? असाही प्रश्न चर्चिला जातो आहे.
Opposition March : ‘आम्हाला पाकिस्तानाच्या सीमेवर असल्यासारखं वाटत होतं’










