LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ, २५० रूपयांनी वाढले दर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. २५० रूपयांनी सिलिंडर महाग झाला आहे. तेल कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांना हा फटका बसला आहे. ही दरवाढ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. मागच्या दोन महिन्यात आत्तापर्यंत ३४६ रूपयांची दरवाढ करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडर धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. २२ मार्चला एलपीजीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता आजपासून पुन्हा दर वाढले आहेत.

ADVERTISEMENT

सुमारे चार महिन्यांच्या कालावधीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. तर, घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरही आजवर दरम्यान स्थिर होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २२ मार्चला ५० रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती. देशातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅसचे दर ९५० रूपयांच्या घरात पोहचले. तर, पाटणात सिलिंडर १ हजार रूपये झाला आहे.

हे वाचलं का?

मुंबईत १९ किलोंचा व्यावसायिक वापराचा सिलिंडर आता २२०५ रूपये झाला आहे. आजची वाढ होण्याआधीचा दर १९५५ रूपये होता. दिल्लीत कमर्शिअल गॅस सिलिंडरची किंमत २२५३ रूपये झाली आहे. १ मार्च हा दर २०१२ रूपये होता. २२ मार्चला जेव्हा या दरात घसरण झाली तेव्हा किंमत २००३ रूपयांवर पोहचली होती.

ADVERTISEMENT

मुंबईमध्ये १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर ९४९.५० रुपये आहे. तर दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दर अनुक्रमे ९४९ रुपये, ९७६ रुपये आणि ९६६ रुपये प्रति सिलिंडर आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये १४.२ किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत एक हजाराहून जास्त आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT