मुंबई आणि पुण्यात कोरोना आटोक्यात, पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक
मुंबईत आज दिवसभरात 2587 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 39 हजार 340 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट त्यामुळे 93 टक्के इतका झाला आहे. मुंबईत आज दिवसभरात 1240 पॉझिटिव्ह केसेस आढळल्या आहेत. तर शहरात आज घडीला 34 हजार 288 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 246 दिवसांवर […]
ADVERTISEMENT
मुंबईत आज दिवसभरात 2587 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 39 हजार 340 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट त्यामुळे 93 टक्के इतका झाला आहे. मुंबईत आज दिवसभरात 1240 पॉझिटिव्ह केसेस आढळल्या आहेत. तर शहरात आज घडीला 34 हजार 288 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 246 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत दिवसभरात 48 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या या मृत्यूंपैकी 28 रूग्णांना सहव्याधी होत्या. तर या 48 रूग्णांपैकी 29 रूग्ण हे पुरुष होते तर 19 रूग्ण या महिला होत्या. आज नोंद झालेल्या 48 मृत्यूंपैकी सहा जण हे 40 वर्षे आणि त्याखालील वयाचे होते. तर 15 रूग्ण हे 40 ते 60 या वयोगटातले होते. 27 रूग्ण हे 60 वर्षे किंवा त्यावरील वयोगटाचे होते. मुंबईत दिवसभरात 17 हजार 640 चाचण्या करण्यात आल्या. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 59 लाख 16 हजार 245 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
पुण्यात काय आहे स्थिती?
हे वाचलं का?
पुण्यात दिवसभरात 684 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर 2 हजार 790 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज घडीला पुणे शहरात 18 हजार 440 सक्रिय रूग्ण आहेत. दिवसभरात 7 हजार 862 चाचण्या करण्यात आल्या. पुण्यात आज दिवसभरात 43 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.
पुण्यात आत्तापर्यंत एकूण 4 लाख 59 हजार 987 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 4 लाख 33 हजार 798 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 हजार 749 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT