सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतली कोरोनाची लस; मुलगी सौंदर्याने केला फोटो शेअर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशभरात कोरोनाचं संकट आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून अनेक नागरिकांनी लसीकरण करून घेतलं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील लस घेतली आहे. असंच साऊथचे सुपरस्टार रजनीकांतने देखील कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला आहे.

ADVERTISEMENT

रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिने सोशल मीडियावर रजनीकांत यांनी लस घेतली असल्याची बातमी दिली. सौंदर्याने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती उभी आहे आणि वडील रजनीकांत सोफ्यावर बसून लस घेत आहेत. दोघांनीही सुरक्षिततेची काळजी म्हणून मास्क लावला आहे. सौंदर्याने रजनीकांत यांच्या फोटोला कॅप्शन देत म्हटलंय, “आमच्या थलाईवरला लस मिळाली आहे. चला एकत्र होऊन कोरोनाला हरवूया”

रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हा, सैफ अली खान, रितेश देशमुख, सोनू सूद, अमिताभ बच्चन, मलायका अरोरा यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. बॉलिवूडमधील अनेकांनी कोरोनाविरोधाल लढाई जिंकली आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलांकारांनी लोकांना आर्थिक मदतीचा हात पुढे केलाय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT