विनापास प्रवास करणाऱ्या पृथ्वी शॉला आंबोली पोलिसांनी रोखलं आणि…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर लॉकडाउन असताना देखील भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ विनापास मुंबईहून कोल्हापूर मार्गे गोव्याला जात होता. मात्र आंबोली पोलिसांनी त्याच्याकडे ई पास ची विचारणा केली असता पृथ्वी शॉ जवळ कोणत्याही प्रकारचा पास नव्हता. अचानक ई पासची मागणी केल्याने पृथ्वीचा गोंधळ उडाला. ई पास असल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असं पोलिसांनी सांगितले त्यानंतर ऑनलाईन पास काढून पृथ्वी गोव्याकडे मार्गस्थ झाला. मुंबईहून प्रवास करताना पृथ्वीला कुठेही पास विचारण्यात आला नाही. मात्र आंबोली पोलिसांच्या जागरूकतेमुळे क्रिकेटरला एक तास आंबोलीत थांबून राहावे लागले.

ADVERTISEMENT

पृथ्वी शॉ सोबत त्याचे मित्र आणि ड्रायव्हरही होता. स्वतःसह सगळ्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट पृथ्वी शॉने पोलिसांना दाखवला. मात्र ई पास विचारण्यात आला तेव्हा तो त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे पृथ्वी शॉला पोलिसांनी अडवलं.

मृतदेहांमधून कोरोना पसरू शकतो, कसे केले जावेत अंत्यसंस्कार?

हे वाचलं का?

बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आंबोली पोलीस दूरक्षेत्राजवळ पृथ्वी शॉची कार आली असता आरोग्य विभागाने पृथ्वी शॉची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी ई पास तपासणीसाठी मागितला असता त्याच्याजवळ कोणताही पास नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे आंबोली पोलिसांनी पासशिवाय जाता येणार नाही असे सांगत पोलिसांनी त्याला तिथेच थांबवले. पृथ्वी शॉ ने आंबोलीतूनच ऑनलाईन पध्दतीने ई पाससाठी अर्ज केला. त्यानंतर एक तासाने त्याचा पास तयार होऊन मोबाईलवर आल्यावर तो पास आंबोली पोलिसांना दाखवून गोव्याकडे मार्गस्थ झाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT