कुख्यात गुंड गज्या मारणे पोलिसांच्या रडारवर; 20 कोटी खंडणी प्रकरणी 14 जाणांवर मोक्का

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : शहरातील शेअर दलाल आणि व्यावसायिकाचे २० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण केल्याच्या आरोपात कुख्यात गुंड गज्या उर्फ गजानन मारणे याच्यासह १४ जणांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी याबाबत आदेश दिले. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या तपासात या टोळीने परिसरात आपले वर्चस्व निर्माण व्हावे आणि अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा याकरीता हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर यासंदर्भात कारवाई करण्यात आली.

ADVERTISEMENT

याबाबत अधिक माहिती अशी, भारती विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिक आणि शेअर दलालाचे अपहरण केल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सोमवारी 4 जणांना अटक केली. त्यानंतर तात्काळ गज्या मारणे आणि त्याचे साथीदार पसार झाले. दरम्यान, यासर्वांच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्यांची नावं :

  • सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप – (वय 43, रा. धनकवडी)

हे वाचलं का?

  • हेमंतऊर्फ आण्णा बालाजी पाटील – (वय 39, रा. बुरली, ता. पलुस, जि. सांगली)

  • अमर शिवाजी किर्दत – (वय 46, रा. सातारा)

  • ADVERTISEMENT

  • फिरोज महंमद शेख – (वय 50, रा. समर्थनगर, सातारा)

  • ADVERTISEMENT

  • गजानन ऊर्फ गज्या ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे – (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) (टोळीप्रमुख)

  • रुपेश कृष्णाराव मारणे – (रा. कोथरुड)

  • संतोष शेलार – (रा.कोथरुड)

  • मोनिका अशोक पवार – (रा. दोपोडी)

  • अजय गोळे – (रा. नऱ्हे)

  • नितीन पगारे – (रा. सातारा)

  • प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, सहकारनगर)

  • तिघे जण सातारचे , एक जण सांगलीचा :

    गज्या मारणेच्या टोळीत कारवाई झालेल्यांपैकी ३ जण सातारचे आणि एक जण सांगलीचा आहे. त्यामुळे आता मारणे टोळीने पुण्याबाहेरही हात पाय पसरले आहेत का? असा सवाल विचारला जात आहे. मात्र आता पोलिसांकडून या प्रकरणातील संशयितांची पाळं-मुळं कुठंपर्यंत रुजली आहेत, या चौघांव्यतिरीक्त आणखी कोण गजा मारणेच्या संपर्कात आहे का? याचा तपास करणार का हे पहावं लागणार आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT