Haridwar Crime: पाच वर्षांपासून सावत्र मुलीवर करत होता रेप; आईला कळताच…
Haridwar Rape News : आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर (Step Daughter) गेल्या पाच वर्षांपासून बलात्कार (Rape) करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी (Police) अटक केली. अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाने अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मागील पाच वर्षांपासून नराधम सावत्र बाप तिच्यावर अतिप्रसंग करत होता. शेवटी तिला त्रास असह्य झाल्याने तिने तिच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. लहान […]
ADVERTISEMENT
Haridwar Rape News : आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर (Step Daughter) गेल्या पाच वर्षांपासून बलात्कार (Rape) करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी (Police) अटक केली. अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाने अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मागील पाच वर्षांपासून नराधम सावत्र बाप तिच्यावर अतिप्रसंग करत होता. शेवटी तिला त्रास असह्य झाल्याने तिने तिच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. लहान वयात वडील गेले, सावत्र वडील मुलीचा सांभाळ करेन असं वाटत असताना त्याने तिलाच आपल्या वासनेचा बळी बनवला. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
Beed: घरात घुसून दिव्यांग मुलीवर बलात्कार, अवघ्या पंधरा दिवसांत मृत्यू!
कानखल भागात ही बाब उघडकीस आली जेव्हा 15 वर्षीय पीडितेच्या शारीरिकदृष्ट्या विकलांग (Handicapped ) आईला याची माहिती मिळाली आणि तिने तिच्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. (kankhal police) कानखल पोलिस स्टेशनचे प्रभारी नरेश राठोड यांनी सांगितले की, या प्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपी अशोकविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. Police registered a case under POCSO against accused Ashok and arrested him
हे वाचलं का?
instagram friend : इन्स्टावर बनला मित्र, मुलीवर बलात्कार करून आईलाच…
पाच वर्षांपासून करत होता लैंगिक अत्याचार
पोलिसांनी सांगितले की, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील मेरठचा असून, हरिद्वारच्या कानखल येथे टेलरिंगचं काम करतो, त्याने 14 वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एका अपंग महिलेशी लग्न केले होते. या महिलेला आधीच एक मुलगी होती. जिच्यावर सोमवारी संध्याकाळी रात्री घरात कोणी नसल्याने आरोपीने पुन्हा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
आरोपीला कठोर शिक्षा करा, नागरिकांमधून मागणी
गेल्या पाच वर्षांपासून आपल्या सावत्र वडिलांच्या चुकीच्या कृत्यांमुळे त्रस्त झालेल्या पीडितेने आपल्या आईला आपला त्रास कथन केला, त्यानंतर आईने पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. पिडीतेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीला कठोर शिक्षा करत पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी देखील होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT