ज्यांच्या रक्तात मुस्लिम समाजाबद्दल विष अशा जातीयवादी भाजपला जाब विचारला पाहिजे-दत्तात्रय भरणे
भाजप पक्ष जातीयवादी पक्ष असून त्यांच्या रक्तातच मुस्लीम बांधवांबद्दल विष आहे. जातीयवादी भाजप पक्षाला आपण जाब विचारला पाहिजे, असे म्हणत दत्तात्रय भरणे यांनी भाजपवर घणाघात केलाय. भरणे आज इंदापूर दौऱ्यावर होते यावेळी इंदापूर शहरातल्या या कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला. अमरावती हिंसाचारामागे भाजप, मुंबईहून पाठवण्यात आले पैसे-नवाब मलिक काय म्हणाले दत्तात्रय भरणे? […]
ADVERTISEMENT

भाजप पक्ष जातीयवादी पक्ष असून त्यांच्या रक्तातच मुस्लीम बांधवांबद्दल विष आहे. जातीयवादी भाजप पक्षाला आपण जाब विचारला पाहिजे, असे म्हणत दत्तात्रय भरणे यांनी भाजपवर घणाघात केलाय. भरणे आज इंदापूर दौऱ्यावर होते यावेळी इंदापूर शहरातल्या या कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला.
अमरावती हिंसाचारामागे भाजप, मुंबईहून पाठवण्यात आले पैसे-नवाब मलिक
काय म्हणाले दत्तात्रय भरणे?
‘काहीही झाले तरी मुस्लिम बांधवांवर काही पक्षाचे प्रमुख ठपका ठेवतात. शेवटी मुस्लिम असो किंवा हिंदू रक्त एकच आहे ना ? आज जे दंगे चालले आहेत त्यापाठीमागे मोठे षडयंत्र आहे. मुंबईसारख्या ठिकाणी एखाद्या कुटुंबाला एका विशिष्ट आडनांव आहे म्हणून त्याला टार्गेट केले जाते. ज्याच्या रक्तातचं मुस्लिमांबद्दल विष आहे अशा भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला आपण जाब विचारला पाहिजे, असा घणाघात सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.