खान्देशात दुष्काळ जाहीर करा ! BJP MLA गिरीश महाजन यांची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जळगावच नव्‍हे तर धुळे आणि नंदुरबार जिल्‍ह्यात यंदा पाऊस झालेला नाही. आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्‍केच पाऊस झालेला आहे. यामुळे खान्देशात बहुतांश ठिकाणी पिकांचं शंभर टक्‍के नुकसान झाले आहे. याकरीता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊन खानदेशात दुष्‍काळ जाहीर करावा अशी मागणी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.

गिरीश महाजन यांच्यातर्फे आज दुष्काळ जाहीर करावा यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिलं.

“जिल्‍ह्यात यंदा पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. आता पाऊस आला नाही तर पुढे जावून पाण्याचा प्रश्‍न गंभीर होईल. यामुळे हे संकट टाळण्यासाठी राज्‍य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा. कारण आता ढगाळ वातावरण असून त्‍याचा फायदा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी होईल”, याकरीता लवकरात लवकर कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी महाजन यांनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT