दीपिका पदुकोणची रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंवर पहिली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली….
अभिनेता रणवीर सिंग हा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्याचं कारण ठरलं आहे त्याने शेअर केलेले न्यूड फोटो. पेपर या मॅगझिनसाठी त्याने हे फोटो काढले आहेत. आता या सगळ्या प्रकरणावर त्याची पत्नी दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दीपिका पदुकोण याबाबत काय म्हणाली आहे ते चर्चेत आहे. रणवीरचं न्यूड फोटोशूट चांगलंच चर्चेत अभिनेता रणवीर […]
ADVERTISEMENT

अभिनेता रणवीर सिंग हा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्याचं कारण ठरलं आहे त्याने शेअर केलेले न्यूड फोटो. पेपर या मॅगझिनसाठी त्याने हे फोटो काढले आहेत. आता या सगळ्या प्रकरणावर त्याची पत्नी दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दीपिका पदुकोण याबाबत काय म्हणाली आहे ते चर्चेत आहे.
रणवीरचं न्यूड फोटोशूट चांगलंच चर्चेत
अभिनेता रणवीर सिंग जितका त्याच्या अभिनयामुळे चर्चेत राहतो, त्यापेक्षा जास्त चर्चा असते त्यांच्या फॅशन सेन्सची. यावेळी रणवीर सिंग सोशल मीडियावर चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याने केलेलं न्यूड फोटोशूट! बॉलिवूडमधील उत्साही अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रणवीर सिंगने मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमी काहीतरी हटके गोष्टी करून चाहत्यांचं आणि लोकांचं लक्ष वेधून घेत असतो. नेहमी वेगवेगळ्या वेशभूषा करणाऱ्या रणवीर सिंग यावेळी जे केलंय, त्याची कुणी कल्पनाही केली नसेल आणि त्यामुळेच लोक त्यावरून जोक करत आहेत. मात्र महत्त्वाचं आहे ते दीपिका पदुकोणचं म्हणणं.
रणवीरच्या न्यूड फोटोंबाबत काय म्हटलंय दीपिका पदुकोणने?
रणवीरचे हे फोटो पाहून मी खूपच इंप्रेस झाले. मला या फोटोशूटची संकल्पना आवडली होती. रणवीरने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी मला दाखवले होते. मला ते फोटो आवडले होते. हे दीपिका पदुकोणने म्हटलं आहे. दीपिका पदुकोणच्या या वक्तव्यानंतर त्याची खूप चर्चा होते आहे.










