फडणवीसांच्या ऐकण्या-पहाण्यात दोष निर्माण झालाय, इतकेही खोटे बोलू नका; राऊतांची बोचरी टीका
मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोपनीय माहिती फुटल्याच्या प्रकरणात आज (13 मार्च) त्यांची चौकशी करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून ही चौकशी करण्यात आली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी पुन्हा एकदा सरकारवरच टीका केली. तसंच यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला होता. ज्यानंतर संजय राऊत यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून […]
ADVERTISEMENT
मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोपनीय माहिती फुटल्याच्या प्रकरणात आज (13 मार्च) त्यांची चौकशी करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून ही चौकशी करण्यात आली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी पुन्हा एकदा सरकारवरच टीका केली. तसंच यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला होता. ज्यानंतर संजय राऊत यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून तात्काळ प्रत्युत्तर केलं आहे.
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही. असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना सुनावलं आहे.
पाहा संजय राऊत यांचं नेमकं ट्विट काय?
हे वाचलं का?
‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किती खोटे पणाने कारवाया करतात याचा पोलखोल करण्यासाठी मी दोन पत्रकार परिषद घेतल्या.पुराव्यासह. इतकेही खोटे बोलू नका.’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे.
घाबरण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किती खोटे पणाने कारवाया करतात याचा पोलखोल करण्यासाठी मी दोन पत्रकार परिषद घेतल्या.पुराव्यासह. इतकेही खोटे बोलू नका.— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2022
पाहा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊतांबाबत काय म्हटलेलं:
ADVERTISEMENT
‘मी तर त्यांनाच विचारु इच्छितो की, मी तर खुल्या मनाने सांगितलं की, मी जायला तयार आहे. संजय राऊत तर रोज घाबरुन-घाबरुन प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. रोज केंद्रीय एजन्सीवर आरोप करतात. मला तर असं वाटतं की, मी तर म्हटलं.. मी यायला तयार आहे. बोलवा.. जिथे मला बोलवायचं आहे तिथे बोलवा. त्यांच्यात आहेत ही हिंमत बोलण्याची?… नाहीए त्यांच्यात ही हिंमत..’
ADVERTISEMENT
‘पत्रकार परिषदेत तर बोलत असतात.. मला का बोलावलं… मला का बोलावलं.. असं रोज बोलतात.’
‘असं आहे की, मला नोटीस आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन घोषित केलं की, हो.. प्रीव्हिलेज असलं तरी ते न वापरता मी त्या ठिकाणी जाणार आहे. मला तर सरकारने विनंती केली की, तुम्ही येऊ नका. पोलिसांनी विनंती केली की, आम्ही टीम तुमच्याकडे पाठवतो. त्यामुळे आम्ही घाबरत नाही.’
‘पण माझा सवाल आहे की, संजय राऊतांच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण झाली तर ते का घाबरतात?’ असं फडणवीस म्हणाले होते.
दरम्यान, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीसाठी पोलीस त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तेव्हा भाजपकडून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केलं. याचवरुन संजय राऊतांनी सकाळी असं ट्विट केलं होतं.
त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, ‘कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?’ असा सवाल करत त्यांनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला होता.
कमाल आहे!
काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत?
महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2022
दरम्यान, संजय राऊत यांनी फडणवीसांबाबत नुकतंच जे ट्विट केलं आहे. त्याला भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही ट्विटरच्याच माध्यमातून उत्तर दिलं आहे.
‘आपला ‘कर्ण’ आणि ‘दृष्टी’दोष अवघा महाराष्ट्र रोज सकाळी पाहतोच.
संजय राऊतजी तुमच्या घामाघूम मर्दुमकीचा हा नमुना समजायचा का?
असो, तुमच्या दोन्ही पत्रपरिषदा तुमचीच पोलखोल करणार्या अधिक होत्या, त्यामुळे ‘आंतरराष्ट्रीय’ पातळीवर मोठी निराशा झाली.
नो क्वेस्शन!’ अशा स्वरुपाचं ट्विट करुन प्रविण दरेकर यांनी फडणवीसांवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना सुनावलं आहे.
मलिकांच्या अडचणी वाढणार?; गोपनीयता भंग प्रकरणात फडणवीसांनी केली मलिकांच्या चौकशीची मागणी
दरम्यान, आता या सगळ्या प्रकारामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT