मनिष सिसोदियांभोवती केंद्रीय यंत्रणांचा फास आवळला जाणार; मद्य धोरण प्रकरणात मोठी घडामोड
दिल्लीतील मद्य उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी झाल्यानंतर आता मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल होणार आहे. सीबीआयने या प्रकरणी ईडीकडे कागदपत्रे सोपवली आहेत. त्यामुळे सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. सीबीआयने एफआयआरची प्रत आणि अन्य कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द केले सीबीआयने एफआयआरची प्रत […]
ADVERTISEMENT

दिल्लीतील मद्य उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी झाल्यानंतर आता मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल होणार आहे. सीबीआयने या प्रकरणी ईडीकडे कागदपत्रे सोपवली आहेत. त्यामुळे सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
सीबीआयने एफआयआरची प्रत आणि अन्य कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द केले
सीबीआयने एफआयआरची प्रत आणि मद्य घोटाळ्याशी संबंधित इतर कागदपत्रे अंमलबजावणी संचालनालयाकडे सुपूर्द केली आहेत. त्यामुळे आता त्याच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. याआधी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह १४ जणांविरुद्ध लुक आउट परिपत्रक जारी केले होते. सीबीआयने ज्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे अशा आरोपींची नावे या परिपत्रकात आहेत. मात्र, यामध्ये मुंबईच्या एंटरटेनमेंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ विजय नायर यांच्या नावाचा समावेश नाही.
शुक्रवारी सिसोदियांच्या घरावर सीबीआयने टाकली होती धाड