फडणवीसांकडून आणखी एक गौप्यस्फोट, यावेळेस थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई तक

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (23 मार्च) एका नव्या प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी फडणवीसांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. ‘राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसाठी मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई न करता प्रकरणावर पांघरुण घातलं. त्यामुळे आता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (23 मार्च) एका नव्या प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी फडणवीसांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. ‘राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसाठी मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई न करता प्रकरणावर पांघरुण घातलं. त्यामुळे आता या प्रकरणी मी केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन थेट सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे.’ असं म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारला एका नव्या मुद्द्यावरुन घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. (Devendra Fadnavis Serious allegations against Thackeray government in phone tapping case)

पोलीस दलातील बदल्यासंदर्भात फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळं प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचविण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्री ठाकरेंनी या प्रकरणाची चौकशी न करता त्यावर चक्क पांघरुण घातलं. त्यांनी आपलं सरकार वाचविण्यासाठी या संपूर्ण प्रकरणावर पांघरुण घातलं. असा दावा फडणवीसांनी यावेळी करण्यात आली आहे.

पाहा देवेंद्र फडणवीस यांनी काय गंभीर आरोप केले:

‘राज्य सरकारमध्ये अधिकाऱ्यांच्या मोठ्या पोस्टिंगसाठी पैशांची मोठी देवाणघेवाण झाल्याचं समोर आलं आहे. पण याप्रकरणी कारवाई करण्याऐवजी अहवाल तयार करणाऱ्या अधिकाऱ्याचीच बदली करण्यात आली.’ असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

हे वाचलं का?