'आदित्य ठाकरेंची लायकी काय? हवेत निवडून आले होते', बावनकुळेंची जहरी टीका!

योगेश पांडे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

BJP Chandrasekhar Bawankule on Aaditya Thackeray : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक युद्ध सध्या जोरदार रंगलं आहे. एकमेकांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपात आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडी घेतली आहे. शनिवारी (20 एप्रिल) ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर आज पुन्हा एकदा माध्यमांशी बोलताना टीकास्त्र सोडले. (BJP Chandrasekhar Bawankule's criticism on Shivsena UBT Aaditya Thackeray and uddhav Thackeray)

ADVERTISEMENT

मनोरुग्ण असल्यासारखे उद्धव वागत आहेत....

'महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक एकवर माननीय देवेंद्र फडणवीस असतील. कारण, जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जनजनामध्ये आहे. महाराष्ट्रात दुसरं एक नालायक लोकांचं सर्वेक्षण केलं तर, एक नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील. उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कमी झाली आहे, त्यांनाही माहित आहे की लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत. अडीच वर्ष पेन न वापरणारा आणि दोन दिवस मंत्रालयात येणारा मुख्यमंत्री आम्ही पाहिला. ते उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना नालायक म्हणत आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही”, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय शरद पवारांनी केला- बावनकुळे

'मोदींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं केलं आणि म्हणूनच आज शेतकरी किमान अशा परिस्थितीमध्येही मजबूत आहेत. पण, शरद पवार आता शेतकऱ्यांच्या गोष्टी करतायेत. पण कृषीमंत्री म्हणून त्या काळामधला त्यांचा इतिहास पाहिला तर सर्वात जास्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय कोणी केला असेस तर ते शरद पवार आहेत. त्यामुळे आता त्यांनी शेतकऱ्यांचा पुळका दाखवू नये. मोदींची गॅरंटी आहे शेतकऱ्यांना मजबूत करण्याची.' 

हे वाचलं का?

आदित्य ठाकरे यांची लायकी काय? 

'मोदींना पुन्हा गुजरातमध्ये परत पाठवू अशा प्रकारे हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला', असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळेंना विचारला असता ते म्हणाले, 'उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे. त्यांना आदित्यला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि देवेंद्रजींच्या तोंडात ते टाकू पाहतात. त्यांनाही माहित आहे आता माझ्या घरातलं कोणी मंत्री होऊ शकत नाही. ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्री पद घेतलं त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर पहिलं काम मुलाला मंत्री केलं.

आदित्य ठाकरेंची लायकी काय? आदित्य ठाकरे हवेत निवडून आले होते. कधी आधार कार्ड काढलं, कधी कोणाची काम केली का? उध्दव ठाकरे यांची मानसिक स्थिती चांगली नाही, लोकप्रियता ढासळली आहे. कोणी त्यांच्या सभा घायला तयार नाही.' अशा शब्दात बावनकुळेंनी ठाकरेंवर जहरी टीका केली. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT