नाईटलाईफ आणि कोरोनावरून देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस हे चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले आहेत. आमचे वरळीचे आमदार आहेत, पर्यावरण मंत्रीही आहेत. त्यांनी आदेश दिला आहे मुंबईत नाईटलाईफ सुरू झालं पाहिजे. ते सुरू झालं आहे.. त्यानंतर आत्ता काही दिवसांपूर्वी मनसेच्या लोकांनी रात्री ११ वाजता फेसबुक लाईव्ह केलं. तिथल्या ठिकाणी जी गर्दी आहे ती पाहून हाच प्रश्न पडतो की कोरोना इथे वाढत नाही का? फक्त मंदिरात आणि शिवजयंतीच्या उत्सवामध्ये वाढतो का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आमचे जे वरळीचे आमदार आहेत पर्यावरण मंत्री आहेत यांचं म्हणणं वरळी मतदारसंघात किती ऐकलं जातं बघा. त्यांचं म्हणणं सगळे तंतोतंत ऐकतात. त्यांनी मागच्या काळात सांगितलं की नाईटलाईफ सुरू झालं पाहिजे. आता कोव्हिडच्या काळातही नाईटलाईफ सुरू आहे. त्यांना माहित नव्हतं लोक काय करतील. त्यांनी चांगल्या, शुद्ध भावनेतून सांगितलं. काल, परवाकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी वरळीतल्या नाईटक्लबमध्ये जाऊन तिथून फेसबुक लाईव्ह केलं. रात्री ११ चे वगैरे नियम जे आहेत ते इतरांकरीता आहेत. कमला क्लबमधल्या यो क्लब, प्रिन्स बार या ठिकाणी फेसबुक लाईव्ह झालं. या लाईव्हमध्ये कितीतरी लोक त्या ठिकाणी होते. मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. कोणीही मास्क घातला नव्हता. त्या ठिकाणी कोव्हिड पसरत नाही. कोव्हिड फक्त मंदिरांमध्ये आणि शिवजयंतीच्या उत्सवात पसरतो. हे बार आणि नाईट क्लब कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? रात्री दोन-तीन पर्यंत बार सुरू आहेत त्यांना सोशल डिस्टन्सिंगचं बंधन का नाही? ” असे प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टोलेबाजी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT