एकनाथ शिंदे म्हणाले, परत ‘करुणा’ दाखवणार नाही; ‘माजलेत बोके’ म्हणणारे धनंजय मुंडे गायब?

मुंबई तक

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभं राहून दररोज आंदोलन करताना दिसताहेत. शिंदे गट आणि भाजपला उद्देशून घोषणाही दिल्या जाताहेत. ‘ताट-वाटी, चलो गुवाहाटी’, ‘पन्नास खोके खाऊन खाऊन माजलेत बोके’, अशा घोषणा देण्यामध्ये आमदार धनंजय मुंडेंही होते. पण, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गर्भित इशारा दिला आणि धनंजय मुंडे आंदोलनातून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभं राहून दररोज आंदोलन करताना दिसताहेत. शिंदे गट आणि भाजपला उद्देशून घोषणाही दिल्या जाताहेत. ‘ताट-वाटी, चलो गुवाहाटी’, ‘पन्नास खोके खाऊन खाऊन माजलेत बोके’, अशा घोषणा देण्यामध्ये आमदार धनंजय मुंडेंही होते. पण, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गर्भित इशारा दिला आणि धनंजय मुंडे आंदोलनातून गायबच झाले. धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीचे वेगवेगळे अर्थ लावले जाऊ लागलेत.

नगराध्यक्षाच्या जनतेतून निवडीच्या विधेयकावर चर्चा करताना धनंजय मुंडेंनी थेट एकनाथ शिंदेंच्या वर्मावर बोट ठेवलं. त्यानंतर ‘देवेंद्रजींनी, प्रेम, दया, करुणा दाखवली; पण परत परत दाखवता येणार नाही’, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत बोलताना केलं. शिंदेंनी हे विधान केलं धनंजय मुंडेंना उद्देशून! त्यानंतर करूणा मुंडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

सोमवारी झालेल्या या राजकीय घडामोडीनंतर मंगळवारी सकाळी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीचे आमदार आले. नेहमीप्रमाणे आमदारांनी शिंदे गटाविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे, राजेश टोपे, छगन भुजबळ, राजेंद्र शिंगणे, हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार उपस्थित होते.

एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंना सभागृहातच दिला गर्भित इशारा; करुणा मुंडेंनी घेतली भेट

हे वाचलं का?