Dhananjay Munde : "भगवानगडाच्या पाठिंब्यामुळे मोठी ताकद मिळाली, आत्मविश्वास वाढला"
धनंजय मुंडे हा गोपीनाथरावांचा पुतण्या आहे. सगळ्या नेत्यांसोबत तो राहिला आहे. त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची नाही. त्याला जाणीवपूर्वीक गुन्हेगार ठरवलं जातंय. यामध्ये वारकरी सांप्रदायाचं नुकसान झालं आहे. 700 वर्षांच्या संतांच्या कार्यावर पाणी फेरलं. जातीय सलोखा यामुळे नष्ट होतोय असंही महंत नामदेव शास्त्री महाराज म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"भगवानगडाचा पाठिंबा मिळाल्याने ताकद वाढली"
Dhananjay Munde : न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास उभं करणं म्हणजे ही फार मोठी ताकद आहे. ती तेवढी मोठी जबाबदारी सुद्धा आहे. भगवानगड माझ्या संकटाच्या काळात उभा आहे ही वाच्यता करणं ही माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. माझ्यावर आलेलं संकट आज नाही आलं, 53 दिवसांपासून सगळं सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया वरुन माझ्यावर ट्रायल सुरू आहे. मी संकटामुळे गडावर आलो नाही. मंत्री झाल्यानंतर भगवानगडावर येण्याची माझी इच्छा होती म्हणून आलो.
बाबांनी दिलेल्या ताकदीमुळेच सर्वसामान्यांची सेवा करण्याची ताकद मिळेल. याच ताकदीमुळे यामधून पुढे निघू. बाबा आम्हाला ज्ञानेश्वरीतले अनेक अनुभव सांगतात, त्यातूनच आपल्याला काहीतरी मिळतं. यावरच आमची चर्चा झाली. जे प्रकरण घडलंय, ते 53 दिवसांपासून सुरू आहे. आमचं पहिल्या दिवसांपासून म्हणणं आहे की, संतोष देशमुख यांच्या आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे. यामध्ये जे कुणी सापडतील त्यांना सोडू नका, त्यांना शासन करा ही आजही माझी भूमिका आहे.
हे ही वाचा >> Manoj Jarange : "वारकरी संप्रदाय काय गुंड चालवतात का?" नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचा सवाल
काहीजण राजकारण करत आहेत, ते फक्त माझ्या राजीनाम्यासाठी आहे की संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आहे. आरोपींना फासवर लटकवणं महत्वाचं आहे की समाजाला, मला टार्गेट करणं महत्वाचं आहे हे पाहिलं पाहिजे असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. मी भगवान गडाचा मी फक्त भक्त आहे. शास्त्रीबाबांचा भक्त आहे. त्यामुळे अशा ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर एक ऊर्जा मिळते काम करण्याची. स्वाभाविक आत्मविश्वास येतो असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.
धनंजय मुंडेंना भक्कम पाठिंबा, नामदेव शास्त्री काय म्हणाले होते?
धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा आहे अशी भूमिका भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी घेतली आहे. धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस किंवा तो गुन्हेगार नाही, त्यांची पार्श्वभूमी नाही. या संपूर्ण प्रकरणाचा भयंकर मोठा परिणाम वारकरी सांप्रदायावरही झाला. मागच्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर मिडियावर ट्रायल झाली आहे. धनंजय मुंडे हे काल रात्रीच भगवान गडावर दाखल झाले होते. यावेळी त्यांची महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा झाली.










