नागपूर महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय राडा

मुंबई तक

–योगेश पांडे, नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या तारखा अद्याप घोषित झालेल्या नाहीत तरीसुद्धा निवडणुकीपूर्वीच नागपुरात भाजप-काँग्रेसमध्ये राजकीय राड्याला सुरुवात झाली आहे. रविवारी नागपुरातील भाजपची प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

योगेश पांडे, नागपूर

महानगर पालिका निवडणुकीच्या तारखा अद्याप घोषित झालेल्या नाहीत तरीसुद्धा निवडणुकीपूर्वीच नागपुरात भाजप-काँग्रेसमध्ये राजकीय राड्याला सुरुवात झाली आहे. रविवारी नागपुरातील भाजपची प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप कुकरेजा यांच्या तर्फे करण्यात आलेला आहे. यानंतर कुकरेजा यांच्या समर्थकांनी आपल्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे.

हे वाचलं का?