मुंबई महापालिका,बेस्ट कर्मचारी, शिक्षकांसह आरोग्य सेविकांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकांची तारीख ठरायची आहे. मात्र या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी, आरोग्य सेविका या सगळ्यांच्याबाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे हा मोठा निर्णय? मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक बेस्टचे कर्मचारी यांना २२हजार ५०० रूपये तर […]
ADVERTISEMENT

मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकांची तारीख ठरायची आहे. मात्र या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी, आरोग्य सेविका या सगळ्यांच्याबाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे हा मोठा निर्णय?
मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक बेस्टचे कर्मचारी यांना २२हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.
या निर्णयामुळे किती कर्मचाऱ्यांना फायदा?
या निर्णयामुळे मुंबई महापालिकेचे ९३ हजार आणि बेस्टचे २९ हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस मिळणार आहे. ‘कोव्हिडच्या बिकट परिस्थितीत मुंबई महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. विकासकामांवर खर्च केलाच पाहिजे पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे’ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना ‘ आनंदात दिवाळी साजरी करा. पण सगळ्यांनी मुंबईकरांसाठी मनापासून काम करा,’ असे आवाहन केले.
बैठकीस खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी तसेच संदिप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी, उत्तम गाडे, अशोक जाधव यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.