जळगाव Sex Scandal ज्यामुळे 27 वर्षांपूर्वी अवघा महाराष्ट्र हादरला होता..

मुंबई तक

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच समोर आलेली डोंबिवली येथील सामूहिक बलात्काराची घटना तर अत्यंत धक्कादायक म्हणावी अशीच आहे. डोंबिवलीतल्या एका अल्पवयीन मुलीवर 33 जणांनी बलात्कार केला. या सगळ्या प्रकरणात आरोपी विजय फुके हा मुख्य आरोपी आहे. त्याची आणि या पीडितेची ओळख इंस्टाग्रामवरून झाली होती. यानंतर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच समोर आलेली डोंबिवली येथील सामूहिक बलात्काराची घटना तर अत्यंत धक्कादायक म्हणावी अशीच आहे. डोंबिवलीतल्या एका अल्पवयीन मुलीवर 33 जणांनी बलात्कार केला. या सगळ्या प्रकरणात आरोपी विजय फुके हा मुख्य आरोपी आहे. त्याची आणि या पीडितेची ओळख इंस्टाग्रामवरून झाली होती. यानंतर अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या पीडितेवर 33 जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने 27 वर्षांपूर्वी घडलेल्या जळगाव सेक्स स्कँडलची वाईट आठवण पुन्हा एकदा महाराष्ट्राला झाली आहे.

काय घडलं होतं 27 वर्षांपूर्वी जळगावमध्ये?

1994 मध्ये जळगाव शहराची राज्यभरात चर्चा झाली होती. याचं कारण होतं कथित सेक्स स्कँडल. त्यावेळी काही राजकीय मंडळींनाही या प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला होता. जळगावमध्ये घडलेल्या या सेक्स स्कँडलमुळे सगळं राज्य आणि सगळा देश हादरला होता. या प्रकरणात बहुतांश शाळकरी मुली आणि महाविद्यालयीन मुली अडकल्या होत्या. त्यांना आमीष दाखवून, गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांचे नग्न अवस्थेत फोटो काढले जात आणि त्यांना ब्लॅकमेल केलं जात असे.

हे वाचलं का?

    follow whatsapp