डोंबिवली: कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गांजा पुरवणाऱ्या तिघांना अटक, २० किलो मुद्देमाल केला जप्त
कल्याण-डोंबिवली शहरात अमली पदार्थांची विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शहरातील कॉलेजमधील विद्यार्थ्यांना हे अमली पदार्थ विकून नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या तिघांना डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून २० किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याच्या ग्रामीण भागातून हा गांजा कल्याण-डोंबिवली शहरात आणला […]
ADVERTISEMENT
कल्याण-डोंबिवली शहरात अमली पदार्थांची विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शहरातील कॉलेजमधील विद्यार्थ्यांना हे अमली पदार्थ विकून नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या तिघांना डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून २० किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याच्या ग्रामीण भागातून हा गांजा कल्याण-डोंबिवली शहरात आणला जात होता. या टोळीतला एक सदस्य डोंबिवली शहरात राहत होता, आनंद देवकर असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी ३ लाख १० हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना गांजा विकण्यात या आरोपीचा पुढाकार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा, परंतू अजुनही आरोपी मोकाटच
हे वाचलं का?
खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मानपाडा पोलिसांच्या पथकाने हॉटेल शिवमच्या शेजारी सापळा रडून आनंद देवकर या आरोपीला अटक केली. मोकळ्या मैदानात आनंद गांजाची दोन पोती घेऊन विकण्यासाठी आलेला असता पोलिसांनी त्याला अटक केली. यापुढे चौकशीदरम्यान पोलिसांना आनंदने आपण हा गांजा धुळे जिल्ह्यातून आणल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी शिरपूर येथील संदीप पावरा आणि रेहमल पावरा यांनाही अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT