डोंबिवली: भाजपच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, घटना CCTV मध्ये कैद
मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवलीमध्ये एका भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप कार्यकर्ता मनोज कटके याच्यावर आज (28 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास अज्ञात इसमांनी डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मनोजला डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवलीमध्ये एका भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप कार्यकर्ता मनोज कटके याच्यावर आज (28 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास अज्ञात इसमांनी डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मनोजला डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याच्यावर पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तर सदर घटनेची माहिती मिळताच आमदार रवींद्र चव्हाण यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयात जमा झाले होते.
याप्रकरणी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी जखमींची भेट घेतली यानंतर त्यांनी हल्लेखोरांना चोवीस तासाच्या आत अटक करा अन्यथा भाजपाकडून तीव्र भूमिका घेतली जाईल असा इशारा दिला आहे.
भाजपा कार्यकर्ते मनोज कटके आपल्या स्पेअर पार्टच्या दुकानात असताना चारचाकी गाडीतून आलेल्या दोघांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकत त्यांना बेदम मारहाण करत जखमी केले. दरम्यान, मनोज यांच्यावर हल्ला कोणी आणि का केला याची माहिती नसली तरी हल्लेखोरांनी वापरलेली गाडी सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांना हल्लेखोराने पर्यंत पोहोचणे शक्य आहे. यामुळेच पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांना अटक करावे अन्यथा भाजप आपल्या पद्धतीने याची दखल घेईल. असंही आमदार चव्हाण म्हणाले.









