जगातली सर्वांत महागडी नंबरप्लेट! दुसरी आलिशान कार खरेदी कराल ‘इतकी’ रक्कम
Worlds most expensive vip number plate : दुबईत सर्वात महागड्या नंबर प्लेटचा (vip number plate) लिलाव करण्यात आला आहे. . या नंबर प्लेटवर P7 हा व्हिआयपी नंबर लिहण्यात आला आहे. या नंबर प्लेटसाठी 55 लाख दिरहमची बोली लागली होती. भारतीय चलनानुसार या प्लेटची किंमत 122.5 करोड रुपये आहे.
ADVERTISEMENT
Worlds most expensive vip number plate : अनेकांना कार्सचा शौक असतो.मात्र क्वचितच लोकांना लक्झरी आणि आलिशान कार खरेदी करता येते.ही आलिशान कार (Luxury Car) खरेदी करणाऱ्यांना व्हिआयपी नंबरचीही (vip number plate) क्रेझ असते. अनेकांना आपल्या गाडीचा नंबर व्हिआयपी असावा असे वाटत होते.त्यानुसार ते नागरीक व्हिआयपी नंबर खरेदी करत असतात.अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत जगातील सर्वांत महागडी नंबर प्लेट विकण्यात आली आहे. ही नंबरप्लेट नेमक्या किती किमतीला विकली गेलीय? तसेच या नंबर प्लेटची खासियत काय आहे? हे जाणून घेऊयात. (dubai man buys worlds most expensive vip number plate p7 here is the cost)
ADVERTISEMENT
कितीची बोली लागली?
दुबईत सर्वात महागड्या नंबर प्लेटचा (vip number plate) लिलाव करण्यात आला आहे. या नंबर प्लेटला सुरुवातीला 15 दिरहमची बोली लागली होती. मात्र काही सेकंदातच ही बोली 30 मिलियनवर पोहोचली होती. त्यानंतर काही मिनिटासाठी हा लिलाव 25 मिलियनवर स्थिर राहिला होता. या दरम्यान एकाने 55 लाख दिरहमची बोली लावली होती. ही या लिलावातली शेवटची बोली होती. त्यानंतर खरीदीदाराच नाव जाहिर करून 55 लाख दिरहममध्ये संबंधित व्यक्तीला विकण्यात आली होती. या नंबर प्लेटला इतकी मोठी बोली लागल्यावर हॉलमध्ये टाळयांचा गडगडाट झाला होता.
हे ही वाचा : VIDEO : ‘रिवॉल्वर रानी’! भर लग्नमंडपात नवरीने खऱ्या खुऱ्या बंदूकीतून झाडल्या गोळ्या
आतापर्यंतची सर्वात महागडी नंबर प्लेट
दुबईत सर्वात महागड्या नंबर प्लेटचा लिलाव (vip number plate) करण्यात आला आहे. या नंबर प्लेटवर P7 हा व्हिआयपी नंबर लिहण्यात आला आहे. या नंबर प्लेटसाठी 55 लाख दिरहमची बोली लागली होती. भारतीय चलनानुसार या प्लेटची किंमत 122.5 करोड रुपये आहे. त्यामुळे 122.5 करोड रूपयांना लिलाव होणारी ही जगातली सर्वांत महागडी नंबर प्लेट बनली आहे. याआधी बुकाटीच्या कार मालकाने F1 ही व्हिआयपी नंबर प्लेट खरेदी केली होती. या नंबर प्लेटची किंमत 132 करोड रूपये होती. या नंबर प्लेटची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
سعادة عمر مطر المناعي المدير التنفيذي للإمارات للمزادات يعرب عن فخره بما حققه مزاد أنبل رقم الخيري الذي نظمته الإمارات للمزادات بالتعاون مع مؤسسة مبادرات محمد بن راشد آل مكتوم العالمية pic.twitter.com/ZQn4867p78
— Emirates Auction الامارات للمزادات (@emiratesauction) April 9, 2023
अमीरात ऑक्शन, दुबई रोड्स एंड ट्रान्सपोर्ट ऑथोरीटी, एतिसलात यांनी जुमेराह या फोर सीजन्स हॉटेलमध्ये हा लिलाव आयोजित केला होता. या दरम्यान इतर व्हिआयपी नंबर आणि फोन नंबरचाही लिलाव करण्य़ात आला. या लिलावात रमजान फुडसाठी 97,920,000 दिरहम म्हणजे 2 अरब 18 करोड रूपयांची रक्कम जमा करण्यात आली. तसेच लिलावात जमा झालेली रक्कम वन बिलियन मील्स अभियानात जाईल. जागतिक भुकबळी विरूद्द लढण्यासाठी या पैशांचा वापर होणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नवी गर्लफ्रेंड सोबत असतानाच समोर आली जुनी प्रेयसी, मग काय..
दरम्यान या बातमीतील व्हिआयपी प्लेटचा (vip number plate) फोटो आता सोशल मीड़ियावर व्हायरल होत आहे. ही सोशल पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT