नितीश कुमार-शरद पवारांच्या भेटीच्या वेळी महाराष्ट्रातले जदयू आमदारही उपस्थित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातले जदयूचे आमदार कपिल पाटील आणि सच्चिदानंद शेट्टीही उपस्थित होते. नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते आहे. २०२४ मध्ये मोदी आणि शाह यांना टक्कर देण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचं काम होतं आहे. एनडीएला महाआघाडी तोंड देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

जदयूचे दोन महाराष्ट्रातले आमदार भेटीदरम्यान उपस्थित

बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्ली येथे सहा जनपथ निवासस्थानी आज भेट झाली. त्यावेळी सोबत महाराष्ट्रातील जदयू आमदार कपिल पाटील आणि सच्चिदानंद शेट्टी हे देखील उपस्थित होते. नितीशकुमार यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी पुढाकार घेतला असून त्यात ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

काय म्हटलं आहे नितीश कुमार यांनी?

आमची चर्चा सुरू आहे. पुढेही या चर्चा होतील. जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा आम्ही सगळे एकत्र येऊ. सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षही एकत्र आले पाहिजेत तसं घडलं तर त्यात राष्ट्राचं हित आहे असंही नितीश कुमार म्हणाले आहे. सगळे पक्ष एकत्र आले तर २०२४ ला राष्ट्रहित घडेल असंही नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का नितीश कुमार?

मोदी आणि शाह यांना टक्कर देण्यासाठी नितीश कुमार हे विविध नेत्यांच्या दिल्लीत भेटी घेत आहेत. अशात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर तुम्ही २०२४ मध्ये विरोधकांच्या महाआघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार असतील का? असा प्रश्न विचारल्यावर नितीश कुमार म्हणाले की मी चेहरा नसेन पण सगळ्यांची मोट एकत्र बांधायची यासाठी पूर्ण प्रय़त्न करणार आहे असंही नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं.

नितीश कुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली होती. मात्र जेव्हा महाराष्ट्रात सत्ताबदल झाला त्यानंतर काही दिवसातच बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली. त्यानंतर त्यांनी राजदला जवळ केलं. काँग्रेसला जवळ केलं. पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री झाले. बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडवणारे नितीश कुमार हे आता देशाच्या निवडणुकीच्या दृष्टीने केंद्रस्थानी आहेत असं मानलं जातं आहे. बिहारचं राजकारण २०१० पासून बदलत गेलं आहे.

ADVERTISEMENT

बिहारचं राजकारण २०१० पासून कसं बदललं?

बिहारमध्ये झालेल्या मागच्या तीन निवडणुकांचा विचार केला तर त्याचा निष्कर्ष हा निघतो की ज्या दोन पक्षांनी एकत्र निवडणूक जिंकली ते पाच वर्षे सत्तेत राहू शकले नाही. मात्र नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी कायम राहिले.

ADVERTISEMENT

२०१० ला जदयू आणि भाजप एकत्र आले होते मात्र २०१३ मध्ये त्यांची युती तुटली. २०१५ मध्ये जदयू आणि राजद यांची युती झाली आणि निवडणूक लढवली गेली मात्र २०१७ मध्ये ही युती तुटली. २०२० मध्ये जदयू आणि भाजप यांनी निवडणूक एकत्र लढवली मात्र २०२२ मध्ये ही युतीही तुटली. हे सगळं घडलं तरीही मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच कायम राहिले ही बाब विशेष आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT